TRENDING:

शनी चालणार उलट चाल, घाबरू नका! 'या' राशींमध्ये असेल तुमची रास, तर तुम्ही व्हाल मालामाल

Last Updated:

शनी म्हटलं की डोळ्यासमोर येते साडेसाती. परंतु शनीदेवांना न्यायदेवता मानलं जातं. ते प्रत्येक व्यक्तीला तिच्या चांगल्या, वाईट कर्माचं फळ देत असतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी
शनीची प्रत्येक चाल प्रत्येक राशीसाठी परिणामकारक असते. मग ती वक्र असेल तरीही.
शनीची प्रत्येक चाल प्रत्येक राशीसाठी परिणामकारक असते. मग ती वक्र असेल तरीही.
advertisement

अयोध्या : ज्योतिषशास्त्रात ग्रह, तारे आणि राशींच्या स्थितीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेव्हा एखादा ग्रह एखाद्या राशीत प्रवेश करतो किंवा राशीबाहेर पडतो, तेव्हा त्याचा परिणाम सर्व 12 राशींवर दिसून येतो. मग काही राशींसाठी ही ग्रहचाल सकारात्मक ठरू शकते, तर काही राशींसाठी नकारात्मक ठरते. प्रत्येक ग्रहांचं वेगवेगळं वैशिष्ट्य आहे. शनी म्हटलं की डोळ्यासमोर येते साडेसाती. परंतु शनीदेवांना न्यायदेवता मानलं जातं. ते प्रत्येक व्यक्तीला तिच्या चांगल्या, वाईट कर्माचं फळ देत असतात.

advertisement

शनीची प्रत्येक चाल प्रत्येक राशीसाठी परिणामकारक असते. मग ती वक्र असेल तरीही. सध्या शनी कुंभ राशीत विराजमान आहे. वर्षभर हा ग्रह इथंच ठाण मांडून बसणार असल्याचं कळतंय. मात्र 29 जून ते 15 नोव्हेंबरपर्यंत शनी वक्र अवस्थेत असेल, पण कुंभ राशीतच. त्यामुळे या अवस्थेचा मानवी जीवनावर प्रभाव पडणार हे नक्की.

संक्रांत काहीच दिवसांवर, नवऱ्यावर असेल जीव, तर करा उपाय; घरात येईल लक्ष्मी, संपेल साडेसाती!

advertisement

अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनीची चाल बदलताच अनेक राशींच्या व्यक्ती मालामाल होतील. यात मेष, वृषभ, तूळ आणि धनू राशीचा समावेश आहे. आता या राशीच्या व्यक्तींना नेमका काय लाभ होईल, पाहूया.

होळीच्या काळात लागणार वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण; 'या' एकाच राशीच्या व्यक्तींनी राहावं सावध!

मेष : शनीच्या वक्र अवस्थेचा आपल्याला प्रचंड फायदा होईल. धनसंपत्तीने आपलं आयुष्य उजळून निघेल. नोकरी, व्यवसायात नव्या संधी उपलब्ध होतील. आपली आर्थिक स्थितीही मजबूत होईल.

advertisement

वृषभ : आपल्याकडेही भरपूर धनसंपत्ती येईल. व्यापार, व्यवसायात फायदाच फायदा होईल. प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. विवाह जुळण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. समाजात आपला मान-सन्मान वाढेल.

तूळ : आपल्यावर शनीदेवांची विशेष कृपा असेल. व्यापारात वृद्धी होईल, धनलाभ मिळेल. आपली पदप्रतिष्ठा वाढेल.

धनू : आपल्याला शनीची वक्र अवस्था करियरबाबत अत्यंत फायदेशीर ठरेल. नशिबाची चांगली साथ मिळेल, आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि घरात सुख-समृद्धी नांदेल.

advertisement

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Agriculture Tips: शेतीला कीड-रोगांचा धोका, उन्हाळ्यात कशी घ्यावी काळजी? पाहा कृषी तज्ज्ञांचा सल्ला, Video
सर्व पहा

लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g

मराठी बातम्या/अध्यात्म/
शनी चालणार उलट चाल, घाबरू नका! 'या' राशींमध्ये असेल तुमची रास, तर तुम्ही व्हाल मालामाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल