TRENDING:

शनी सूर्यासोबत येणार 'या' राशीत, फायदा मात्र होणार दुसऱ्यालाच, कदाचित तुमचंही उजळू शकतं नशीब!

Last Updated:

सूर्य आणि शनीला पिता-पूत्र जरी मानलं जात असलं तरी या दोन्ही ग्रहांना एकमेकांचे शत्रूसुद्धा म्हटलं जातं. त्यामुळे त्यांच्या युतीतून शुभ योग निर्माण होणार नाहीये.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कृष्णा कुमार गौड, प्रतिनिधी
काळजी नसावी, याचा काही राशीच्या व्यक्तींना त्रास जरी होणार असेल तरी...
काळजी नसावी, याचा काही राशीच्या व्यक्तींना त्रास जरी होणार असेल तरी...
advertisement

जोधपूर : ज्योतिषशास्त्रात ग्रह, ताऱ्यांच्या स्थितीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यात सूर्य आणि शनीमध्ये तर पिता-पुत्राचं नातं असल्याचं मानलं जातं. त्यामुळे अर्थातच या दोन ग्रहांच्या स्थितीबदलाचा सर्वच राशींवर परिणाम होतो. त्यातून काही राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात सुख येतं, तर काही राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात अडचणींमागून अडचणी येतात.

ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिन्यात सूर्य आणि शनीच्या स्थितीत बदल होणार आहे. कुंभ राशीत या दोन्ही ग्रहांची युती होईल. ज्योतिषी डॉक्टर अनीष व्यास यांनी सांगितलं की, 13 फेब्रुवारीपासून सूर्य आणि शनी ग्रह एकत्र कुंभ राशीत राहतील. त्यानंतर 15 मार्चला सूर्य मीन राशीत जाईल. विशेष म्हणजे शनी आणि सूर्याच्या युतीमुळे शुभ योग निर्माण होणार नाहीये, तर या युतीतून 14 एप्रिलपर्यंत सूर्य आणि शनीचा अशुभ द्विर्द्वादश योग असेल. त्यामुळे काही राशींच्या व्यक्तींना मानसिक आणि शारीरिक अडचणींचा सामना करावा लागेल. शिवाय त्यांचे वादही मोठ्या प्रमाणात होतील.

advertisement

सकाळी झोपेतून उठल्यावर चुकूनही करू नका 'हे' काम, घरातलं सुख कायमचं होईल नष्ट!

13 फेब्रुवारीला जेव्हा सूर्य कुंभ राशीत प्रवेश करेल तेव्हापासून काही राशींसाठी पुढचे 30 दिवस त्रासाचे असतील. कारण सूर्य आणि शनीला पिता-पूत्र जरी मानलं जात असलं तरी या दोन्ही ग्रहांना एकमेकांचे शत्रूसुद्धा म्हटलं जातं. त्यामुळे आपल्या कुटुंबासह आर्थिक स्थितीपर्यंत संपूर्ण परिस्थितीवर या ग्रह युतीचा प्रभाव पडेल. परंतु काळजी नसावी याचा काही राशीच्या व्यक्तींना त्रास जरी होणार असला, तरी काही राशींच्या व्यक्तींचं नशीब उजळेल हेसुद्धा खरं आहे. त्या राशी नेमक्या कोणत्या आहेत, पाहूया.

advertisement

लग्न जुळण्यात अडचणी येतात, मनासारखा जोडीदार मिळतच नाहीये? काळजी नको, यावर उपाय आहे!

मेष : आपल्याला सूर्य आणि शनीच्या युतीचं राजयोगासमान फळ मिळणार आहे. या काळात आपल्याला मित्रमंडळी आणि नातेवाईकांकडून प्रचंड मदत मिळेल. आपल्याला स्वत:चं काम सुरू करण्याची संधीही मिळेल.

वृषभ : आपल्यालासुद्धा या काळात प्रचंड लाभ होणार आहे. मागील बऱ्याच काळापासून अडकलेले आपले पैसे आता परत मिळतील. नवी प्रॉपर्टी खरेदी करायची असेल, तर या काळात करू शकाल.

advertisement

मिथुन : आपल्याला आपल्या नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कामानिमित्त प्रवास होऊ शकतो. घरात शुभ कार्य घडेल. धर्मिक कार्यात सहभागी व्हाल.

तूळ : नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना यश मिळेल. शेअर बाजारात गुंतवणूक करताना जरा सावध राहा. परंतु या काळात मित्रमंडळी आणि नातेवाईकांकडून चांगलं सहकार्य मिळेल.

धनू : आपल्यासाठी हा काळ पराक्रमाचा असेल असं म्हणायला हरकत नाही, कारण आपल्याला आपल्या मेहनतीचं फळ या काळात मिळणार आहे. नशिबाचीही चांगली साथ मिळेल. धार्मिक प्रवास होऊ शकतो. वडिलांकडून चांगलं सहकार्य मिळेल. आर्थिक बाजूही उत्तम असेल.

advertisement

मकर : आपल्याला या काळात प्रसिद्धी मिळेल. गुंतवणूकीतून चांगला नफा होईल. परंतु घरात कोणताही वाद होणार नाही याची काळजी घ्या आणि वाहन जपून चालवा.

मीन : परदेशी जाण्याचा विचार करत असाल तर त्यात आता यश मिळेल. परदेशात जाऊन शिक्षणही घेऊ शकता. याच काळात आपल्याला मनासारख्या नोकरीची संधीही मिळू शकते. फक्त आरोग्य तेवढं जपा.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो… या लिंकवर क्लिक करा

मराठी बातम्या/अध्यात्म/
शनी सूर्यासोबत येणार 'या' राशीत, फायदा मात्र होणार दुसऱ्यालाच, कदाचित तुमचंही उजळू शकतं नशीब!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल