TRENDING:

भाजी रोजचीच पण औषधी गुणांनी परिपूर्ण; वजन करते कमी!

Last Updated:

या भाजीमुळे शरिरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही कमी होतं. तसंच त्वचेबाबतच्या समस्या दूर होतात. कारण या भाजीत बी6 थायमिन पॅनथाथेनिक ऍसिड आणि नियासिन भरपूर प्रमाणात असतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सौरभ वर्मा, प्रतिनिधी
या भाजीत आयर्न, कॉपर, मॅग्नेशियम, फॉस्फरस, प्रोटीन, इत्यादी पोषक तत्त्व असतात.
या भाजीत आयर्न, कॉपर, मॅग्नेशियम, फॉस्फरस, प्रोटीन, इत्यादी पोषक तत्त्व असतात.
advertisement

रायबरेली : बदलत्या हवामानासह आहारही बदलतो. बाजारात हंगामी फळं आणि भाज्या उपलब्ध झाल्याने जेवणात वेगवेगळ्या फळांचा आणि भाज्यांचा समावेश होतो. आज आपण अशा एका भाजीबाबत जाणून घेणार आहोत जिला हिवाळ्यात विशेष मागणी असते. शिवाय या भाजीत अनेक प्रकारचे पोषक तत्त्वही असतात. त्यामुळे ती आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.

ही भाजी दुसरी-तिसरी कोणती नाही, तर आपल्या जेवणातली रोजचीच वाल पापडी आहे. ग्रामीण भाग असला किंवा शहर असलं, लोक ही भाजी अत्यंत आवडीने खातात. विशेष म्हणजे अनेकजणांना माहितही नसेल परंतु या भाजीत अनेक औषधी गुणधर्म असतात. शिवाय चवीला ती उत्तम लागते हे काही वेगळं सांगायला नको.

advertisement

डिनरमध्ये खा 'हे' पदार्थ, वजन होईल कमी, शरीर राहील ऊर्जावान!

वाल पापडीत आयर्न, कॉपर, मॅग्नेशियम, फॉस्फरस, प्रोटीन, इत्यादी पोषक तत्त्व आढळतात. जे आरोग्यसाठी अत्यंत फायदेशीर असतात. उत्तर प्रदेशातील रायबरेलीच्या आयुर्वेदिक डॉ. स्मिता श्रीवास्तव सांगतात की, वाल पापडीचा आहारात समावेश केल्यास रोगप्रतिकारक शक्ती कमालीची वाढते.

दारात करा 'हा' उपाय, घरातलं भांडण मिटेल, आर्थिक संकटही संपेल!

advertisement

या भाजीमुळे शरिरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही कमी होतं. तसंच त्वचेबाबतच्या समस्या दूर होतात. कारण या भाजीत बी6 थायमिन पॅनथाथेनिक ऍसिड आणि नियासिन भरपूर प्रमाणात असतं. महत्त्वाचं म्हणजे स्थूलपणा कमी करण्यासही ही भाजी उपयुक्त ठरते. अंगात कुठेही सूज असल्यास तीदेखील या भाजीमुळे कमी होते.

लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g

advertisement

मराठी बातम्या/अध्यात्म/
भाजी रोजचीच पण औषधी गुणांनी परिपूर्ण; वजन करते कमी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल