पैशाचा योग्य वापर झाला पाहिजे. जे लोक पैशाचा घमेंड आणि रागात वापर करतात, त्यांचे जीवन उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर येते. अशा लोकांवर माता लक्ष्मी कधीही आपला आशीर्वाद वाया घालवत नाही. चाणक्याच्या मते, जेव्हा माणूस धन मिळविण्याच्या लालसेने इतरांचे नुकसान करतो. प्रियजनांना त्रास देऊन पैसे कमविण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा तो चुकीच्या आणि अनैतिक गोष्टी करू लागतो, तेव्हा लक्ष्मी रागावते आणि अशा व्यक्तीला सोडून निघून जाते.
advertisement
Diwali 2023: दिवाळीच्या पूजेत ठेवा एक रुपयाची ही गोष्ट, माता लक्ष्मी होईल प्रसन्न
पैसा आल्यावर जे अहंकारी होतात, संपत्तीचा माज दाखवतात त्यांच्यावर माता लक्ष्मीचा कोप होतो. ही चूक श्रीमंतांनाही गरीब करते. अशा लोकांना लक्ष्मी शिक्षा देते. लक्ष्मीला स्वच्छता जास्त प्रिय आहे. म्हणूनच त्यांना अशा ठिकाणी राहणे आवडत नाही जिथे स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही. लक्ष्मी असे स्थान सोडून निघून जाते.
ज्या घरात स्त्रियांचा अपमान होतो, मोठ्यांचा आदर होत नाही त्या घरात लक्ष्मी कधीच वास करत नाही. देवी लक्ष्मी अशा कुटुंबातील सदस्यांची प्रतिभा, क्षमता आणि आदर या सर्व गोष्टींचा नाश करते.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)