अयोध्या : तुम्ही कोणावर जीवापाड प्रेम करत असाल पण त्या व्यक्तीसमोर आपल्या भावना व्यक्त करायला संकोच वाटत असेल, तिला गमावण्याची भीती वाटत असेल, तर ही बातमी तुमच्याचसाठी आहे. व्हॅलेंटाईन डे आता काही दूर नाही. येत्या 14 तारखेला हा प्रेमाचा दिवस जगभरात साजरा होईल.
खरंतर प्रेमात फक्त मनं जुळणं नाही, तर राशी जुळणं महत्त्वाचं असतं. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा ग्रह, तारे आपल्या राशीच्या बाजूने असतात तेव्हा आपल्याला आपलं खरं प्रेम मिळतं. उत्तर प्रदेशच्या अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम सांगतात की, 'प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात ग्रह, ताऱ्यांची स्थिती अत्यंत महत्त्वाची असते. जेव्हा जेव्हा ग्रह आपली चाल बदलतात तेव्हा तेव्हा त्याचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो. मग त्या राशीच्या व्यक्तींना करियर, प्रेम, आरोग्य अशा सर्वच बाबींमध्ये बदल पाहायला मिळतात. ते बदल काही वेळा सकारात्मक असतात, काही वेळा नकारात्मक असतात. अशाचप्रकारे यंदाचा व्हॅलेंटाईन डे हा चार राशींच्या व्यक्तींसाठी खूप खास आहे. या राशींच्या व्यक्तींना व्हॅलेंटाईन डेला आपलं खरं प्रेम मिळणार आहे, त्यामुळे त्या नेमक्या कोणत्या आहेत पाहूया.
advertisement
सर्वांसाठी सारखा नसेल Valentine Day; जोड्या जर 'या' राशीच्या असतील, तर काही खरं नाही!
'या' राशींसाठी व्हॅलेंटाईन डे आहे खास
मकर : आपल्यासाठी ही वेळ शुभ आहे. त्यामुळे आपण आवडत्या व्यक्तीसमोर प्रेम व्यक्त करू शकता. आपल्याला पार्टनरसोबत रोमँटिक वेळ घालवायला मिळेल, त्यामुळे नातंही खुलेल.
पैशांसाठी घरात कासव पाळता, पण त्याचे नियम माहितीयेत ना? नाहीतर असेल नसेल ती संपत्तीही बुडेल
वृश्चिक : आपल्याला एक रोमँटिक सरप्राईज मिळणार आहे. रिलेशनशिपमध्ये असाल तर प्रेम आणखी वाढेल.
कर्क : आपल्याला आयुष्याचा जोडीदार भेटणार आहे. रिलेशनशिपमध्ये असाल तर लग्न जुळू शकतं. प्रियकर, प्रेयसीमध्ये भांडण झालं असेल तर ते संपेल आणि तुमच्यातलं प्रेम आणखी वाढेल.
वृषभ : आपल्या आयुष्यात एक नवा जोडीदार येणार आहे. एका हेल्थी रिलेशनशिपची सुरूवात कराल. ज्यांचं नातं आधीपासूनच घट्ट आहे, त्यांचं प्रेम आणखी वाढेल.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो… या लिंकवर क्लिक करा
