पैशांसाठी घरात कासव पाळता, पण त्याचे नियम माहितीयेत ना? नाहीतर असेल नसेल ती संपत्तीही बुडेल
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
देवी लक्ष्मी ही भगवान विष्णू यांची पत्नी आहे. त्यामुळे विष्णूंचा अवतार मानला जाणारा कासव घरी आणणं म्हणजे सुख घरी आणण्यासारखं असतं. शिवाय कासवाला भगवान कुबेर आणि लक्ष्मी देवीचा आशीर्वादही म्हणतात.
शुभम मरमट, प्रतिनिधी
उज्जैन : कासवाला केवळ वास्तूशास्त्रात महत्त्व नाहीये, तर ज्योतिषशास्त्रातदेखील कासव अत्यंत शुभ मानला जातो. घरात कासव असणं हे सुखाचं लक्षण असतं, असं म्हणतात. कारण कासव हा भगवान विष्णूंचा अवतार मानला जातो. त्यामुळे जिथे कासव असेल तिथे लक्ष्मीचा वास निर्माण होतो. परंतु कासव पाळण्याचेही काही नियम आहेत.
उज्जैनचे ज्योतिषी पंडित भोळा शास्त्री यांनी कासवाचे काही उपाय सांगितलेले आहेत. देवी लक्ष्मी ही भगवान विष्णू यांची पत्नी आहे. त्यामुळे विष्णूंचा अवतार मानला जाणारा कासव घरी आणणं म्हणजे सुख घरी आणण्यासारखं असतं. शिवाय कासवाला भगवान कुबेर आणि लक्ष्मी देवीचा आशीर्वादही म्हणतात. कासवामुळे घरातले सर्व वास्तूदोष नष्ट होतात. घरातल्या व्यक्तींना काही आजार असतील तर तेदेखील दूर होतात. शिवाय आर्थिक अडचणींवरसुद्धा उपाय मिळतो.
advertisement
इच्छापूर्तीसाठी काय करावं?
वास्तूशास्त्र सांगतं की, काहीच मनासारखं घडत नसेल तर एका कोऱ्या कागदावर लाल पेनाने आपली इच्छा लिहावी आणि तो कागद धातूच्या कासवामध्ये ठेवून कासवाला उत्तर दिशेत ठेवावं. त्यानंतर 40 ते 60 दिवसांतच सारंकाही आपल्या मनासारखं घडायला सुरूवात होईल.
advertisement
कोणता कासव कुठे ठेवावा?
- नवा व्यवसाय सुरू करत असाल किंवा नव्या नोकरीत रुजू होत असाल, तर कामाच्या ठिकाणी चांदीचा कासव ठेवावा. त्यामुळे तिथे लक्ष्मीचा वास निर्माण होतो आणि आयुष्यात आर्थिक स्थैर्य येतं.
- घरात क्रिस्टल म्हणजेच स्फटिकाचा पारदर्शक कासव ठेवणं शुभ मानलं जातं. त्यामुळे हळूहळू सर्व आर्थिक अडचणी दूर होऊन घरातली नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते.
- अभ्यासाच्या टेबलावर पितळेचा कासव ठेवावा, त्यामुळे विद्यार्थ्यांचं अभ्यासात लक्ष लागतं. शिवाय कोणाची दृष्ट लागली असेल, तर त्यामुळे आपलं काहीही वाईट होत नाही.
- कासव घरात किंवा ऑफिसमध्ये उत्तर दिशेत ठेवावा. त्याचा चेहरा आतल्या बाजूला असेल आणि तो तिथे एकटाच असेल याची काळजी घ्या. त्यामुळे आपल्याला शुभ परिणाम पाहायला मिळतात.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Ujjain,Madhya Pradesh
First Published :
Feb 05, 2024 3:14 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
पैशांसाठी घरात कासव पाळता, पण त्याचे नियम माहितीयेत ना? नाहीतर असेल नसेल ती संपत्तीही बुडेल










