तसेच संकट आलं तर देवानं आपलं रक्षण करावं, असं आपल्याला वाटतं. पण वास्तु, ज्योतिषशास्त्रानुसार कारमध्ये अशा प्रकारे मूर्ती ठेवणं अयोग्य असल्याचं सांगितलं गेलं आहे. यामागे काही कारणं सांगण्यात आली आहेत. ही कारणं कोणती ते सविस्तर जाणून घेऊया.
कार खरेदी करण्यापूर्वी आपण तिची फीचर्स, रंग तसेच अन्य टेक्निकल गोष्टी तपासतो. नवीन कार आपल्यासाठी शुभ ठरावी अशी प्रत्येकाची भावना असते. त्यामुळे कार खरेदी केल्यावर आपण सर्वप्रथम देवदर्शनासाठी जातो. तसंच बहुतांश लोक नवीन कारमध्ये आराध्यदेवतेची मूर्ती ठेवतात.
advertisement
सामान्यपणे लोक कारमध्ये श्री गणपती, श्री शंकर, दुर्गादेवी किंवा श्रीकृष्णाची मूर्ती बसवतात. आपल्यावर संकट आलं तर देवानं आपलं रक्षण करावं, अशी त्यामागची भावना असते. पण वास्तुशास्त्र अभ्यासकांच्या मते, कारमध्ये देवाची मूर्ती ठेवताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. काही लोकांनी तर कारमध्ये मूर्ती ठेवणं टाळावं.
नवीन कार घेतल्यानंतर डॅश बोर्डवर देवाची मूर्ती कदापि ठेवू नये. त्याऐवजी तुम्ही देवाचा छोटा फोटो लावू शकता. ज्या व्यक्ती कारमध्ये बसून मद्यपान, धूम्रपान करतात किंवा मांसाहार करतात त्यांनी कारमध्ये देवाची मूर्ती ठेवणं टाळावं. ज्योतिषशास्त्रानुसार, जर तुम्ही कारमध्ये देवाची मूर्ती ठेवली असेल तर कारची नियमित साफसफाई करावी. कारमध्ये मूर्ती असेल तर कारमध्ये बसून मद्यपान करू नये.
यामुळे देवाचा अपमान होतो आणि ते नाराज होतात. वास्तुशास्त्रानुसार, ज्या व्यक्तींनी कारमध्ये देवाची मूर्ती ठेवली आहे, त्यांनी धूम्रपान कदापि करू नये. या शिवाय, कारमध्ये देवाची मूर्ती किंवा फोटो लावला असेल तर कारमध्ये बसून कांदा, लसूण खाणं आणि मांसाहार करणं टाळावं. ज्योतिष शास्त्रात देखील या गोष्टी अशुभ मानल्या गेल्या आहेत. त्यामुळे कारमध्ये देवाची मूर्ती ठेवण्याऐवजी फोटो लावणं योग्य आहे.
(इथे दिलेली माहिती ही सामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज 18 मराठी या माहितीची कोणतीही खातरजमा करत नाही.)
