देवघर : नव्या वर्षाचं आपण सर्वांनी धुमधडाक्यात स्वागत केलं. आता या वर्षाचे बाराही महिने सुखात जावे आणि आपली प्रगती व्हावी यासाठी जवळपास प्रत्येकाने काहीना काहीतरी संकल्प केलाच असेल. खरंतर सर्वांनाच वाटतं की, मागच्या वर्षापेक्षा माझं हे वर्ष अधिक सुखात जावं. मात्र त्यासाठी काही उपाय करणंही आवश्यक असतं, कारण ज्योतिषशास्त्रानुसार वर्ष कसं सरणार हे त्या त्या व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रह-ताऱ्यांच्या स्थितीवर अवलंबून असतं.
advertisement
ज्योतिषशास्त्रात सांगितल्यानुसार उपाय केल्यास घरात सुख-समृद्धीचं वातावरण निर्माण होतं. त्यामुळे झारखंडच्या देवघरचे ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुदगल यांनी याबाबत नेमकं काय सांगितलंय पाहूया.
हातात मारुतीरायाचा झेंडा, अंगात बुरखा; त्या पायी निघाल्या अयोध्येला!
ज्योतिषी म्हणाले, नवं वर्ष सुखात जावं असं वाटत असल्यास तुळशीचे उपाय करावे. आपल्या घराच्या मुख्य दरवाजातच आपण साधे, सोपे उपाय करू शकता. यामुळे केवळ आपल्या घरात सुख, समृद्धीचं वातावरण निर्माण होणार नाही, तर आपली आर्थिक प्रगतीदेखील होईल. शिवाय कोणतंही आर्थिक संकटही उद्भवणार नाही.
राम मंदिरासाठी काही दान करायचंय पण माहिती नाही कसं करावं, ही घ्या माहिती...
नव्या वर्षात करा तुळशीचे उपाय
हिंदू धर्मात तुळशीला लक्ष्मी देवीचं रूप मानलं जातं. तुळशीत लक्ष्मीचा वास असतो. तुळशीपूजनाने आर्थिक संकटं दूर होतात. त्याचबरोबर घराच्या मुख्य दरवाजात तुळशीच्या रोपाची मूळं, दुर्वा आणि तांदूळ लाल कापडात बांधून टांगल्यास घरात कधीच नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होत नाही. घरातील सर्व वादविवाद मिटतात आणि सर्वत्र आनंदाचं वातावरण निर्माण होतं.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g