तुमच्या मूलांकानुसार कोणते घड्याळ घालावे?
मूलांक १ : मूलांक १ असलेल्या लोकांनी सोनेरी रंगाचे धातूची साखळी असलेले घड्याळ घालावे. हे घड्याळ तुमच्यासाठी प्रगती करणारे असेल. तुम्ही हे घड्याळ रविवारपासून घालावे.
मूलांक २ असलेल्या लोकांनी धातूची साखळी असलेले चांदीचे किंवा पांढऱ्या रंगाचे घड्याळ घालावे. सोमवारपासून हे घड्याळ घालावे.
मूलांक 3 असलेल्या लोकांनी देखील सोनेरी रंगाचे मनगटी घड्याळ घालावे. तुम्ही गुरुवारपासून हे घड्याळ घालावे.
advertisement
मूलांक ४ असलेल्या लोकांसाठी धातूचे राखाडी रंगाचे घड्याळ घालणे चांगले राहील. हे घड्याळ शनिवारपासून घालता येते.
मोठी चूक झाल्यासारखं वाटत असताना चक्र फिरणार! उच्च राशीतील सूर्य या राशींना लकी
मूलांक 5 असलेल्या लोकांनी चांदी आणि सोनेरी रंगाच्या मिश्रणाचे घड्याळ घालावे. बुधवारपासून ते परिधान करणे शुभ राहील.
मूलांक ६ असलेल्या लोकांसाठी घड्याळ: मूलांक ६ असलेल्या लोकांनी शुक्रवारपासून सोनेरी रंगाचे घड्याळ घालावे. ते तुमच्यासाठी शुभ राहील.
भाग्यांक 7 असलेल्या लोकांनी देखील सोनेरी रंगाचे घड्याळ घालावे. शनिवारपासून हे घड्याळ घालण्यास सुरुवात करावी.
भाग्यांक 8 - मूलांक ८ असलेल्या लोकांनी मनगटावर काळ्या रंगाचे घड्याळ घालावे. हे घड्याळ फक्त शनिवारपासून घाला.
मूलांक 9 च्या लोकांसाठी सोनेरी किंवा तांब्याचे रंगाचे घड्याळ घालणे शुभ ठरते. हे घड्याळ मंगळवारी परिधान करावे.
घड्याळ घालताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी -
घड्याळ घातल्यानंतर घड्याळाची वेळ योग्य असायला हवी. तुमच्या घड्याळातील वेळ पुढे किंवा मागे नसावी. तुम्ही तुमच्या जन्मक्रमांकानुसार योग्य घड्याळ घालाल तेव्हा तुमचे सर्व काम वेळेवर होईल. तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू लागतील. तुमचा वाईट काळही चांगला होईल.
यावर्षी जुलैमध्ये येणार महाप्रलय! जपानी बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनं वाढलं टेन्शन
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)