फरीदाबाद : चैत्र महिन्यात चैत्र नवरात्र साजरी होते. जसा शारदीय नवरात्रीच्या दहाव्या दिवशी दसरा साजरा होतो, त्यादिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला होता, अशी मान्यता आहे. त्याचप्रमाणे चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता, असं मानलं जात असल्यानं धुमधडाक्यात रामनवमी साजरी केली जाते.
ज्योतिषी गंगाराम शास्त्री सांगतात की, या दिवशी रावणाच्या अत्याचारांचं खात्मा करण्यासाठी भगवान विष्णूंनी राम अवतारात जन्म घेतला होता. श्रीराम हे भगवान विष्णूंचे सातवे अवतार मानले जातात. त्रेतायुगात धर्माच्या स्थापनेसाठी त्यांचा जन्म झाला होता. याच दिवशी सूर्य, बुध, गुरु, शुक्र आणि शनी ग्रहांचा एक अत्यंत विशेष योग निर्माण झाला होता. हे सर्व ग्रह त्यावेळी आपापल्या उच्च राशीत विराजमान होते.
advertisement
हेही वाचा : Astrology: रामनवमीला अत्यंत शुभ योग, सूर्य उजळेल नशीब; साक्षात श्रीराम अवतरतील घरी!
रामनवमीचा शुभ मुहूर्त
हिंदू पंचांगानुसार, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीला म्हणजेच 16 एप्रिल रोजी दुपारी 01 वाजून 23 मिनिटांपासून 17 एप्रिल रोजी दुपारी 03 वाजून 14 मिनिटांपर्यंत रामनवमीचा शुभ मुहूर्त होता. त्यामुळे रामनवमी ही 17 एप्रिल रोजीच साजरी होईल.
हेही वाचा : Ram Navami 2024: अयोध्येच्या राम मंदिरात पहिल्यांदाच असं घडलं, रामलल्लाच्या मूर्तीवर…Photos
ज्योतिषांनी सांगितलं की, चैत्र नवरात्रीत निर्माण होणाऱ्या रवी योगामुळे कुंडलीतल्या सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्ती मिळेल. हा योग अत्यंत शुभ मानला जातो. ज्यामध्ये सूर्याचा प्रभाव प्रचंड असतो. श्रीरामांची मनोभावे पूजा केल्यास हाती घ्याल त्या कार्यात यश मिळेल आणि आपला समाजात मान-सन्मान वाढेल, असं ज्योतिषी म्हणाले.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)