हे पूर्वजांचं प्रतीक मानतात
पितृपक्षात कावळ्याने अन्न खाणं हे विशेष महत्त्वाचं असल्याचंही सांगितलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार कावळा यमाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. या काळात कावळ्यांची उपस्थिती हे पूर्वज आजूबाजूला असण्याचं लक्षण मानतात. पितृपक्षात संपूर्ण 15 दिवस कावळ्यांना अन्न खायला द्यावे, असे मानले जाते.
कावळा सापडला नाही तर काय करावं?
पितृपक्षात कावळा अन्न खाण्यास सापडला नाही तर गाय किंवा कुत्र्याला जेवण द्यावं, असं म्हटलं जातं. या काळात पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करण्याचे विशेष महत्त्व सांगितले आहे. पिंपळाचं झाड हे पूर्वजांचं प्रतीक मानलं जातं, त्यामुळे पितृपक्षात पिंपळाच्या झाडाची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे या महिन्यात श्राद्ध घालताना पिंपळाची पूजाही केली जाते.
advertisement
29 सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू, या 3 तिथींना करा श्राद्ध; अन्यथा पितृ होतील नाराज
कावळा मेल्यानंतर कावळ्याचे सोबती काय करतात?
धार्मिक मान्यतेनुसार, कावळा कधीही स्वत:ला मारत नाही किंवा कोणत्याही आजाराने मरत नाही. उलट कावळे अचानक मरतात. कळपातील कोणताही कावळा ज्या दिवशी मेला, त्या दिवशी त्याचे इतर कावळे अन्न खात नाहीत.
पितृपक्षात श्राद्ध का घालतात?
हिंदूधर्मात श्राद्ध हे मृत वडिलधाऱ्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी केलं जातं. हिंदू धर्मग्रंथांमध्ये वडिलांचे ऋण सर्वात मोठं आणि महत्त्वाचं मानतात. वडिलोपार्जित ऋणाव्यतिरिक्त हिंदू धर्मात देव आणि ऋषी ऋणंदेखील आहेत, परंतु वडिलोपार्जित ऋृण हे सर्वात मोठं ऋण आहे. श्राद्ध घालण्याची सर्व कामे करताना विशेष नियम पाळले जातात.