ॐ शब्द तीन अक्षरांनी बनलेला आहे. अ,उ आणि म या शब्दांला सर्व सृष्टीचे प्रतीक मानले गेले आहे. ॐ हा ब्रह्मांडातून निर्माण झालेला पहिला ध्वनी आहे. ॐ चा उच्चार केल्यामुळे एक निसर्गातील ऊर्जेची अनुभूती होते. ॐ शब्दांत वेदांचे, तसेच तपस्वी आणि योगी यांचे सार सामवले आहे. जेव्हा आपण मंत्रांचा जप करतो, तेव्हा त्याची सुरुवात ॐ ने केली जाते. हिंदू धर्मग्रंथात सांगितले आहे की, जेव्हा आपण कोणत्याही मंत्राआधी ॐ लावतो, तेव्हा असे केल्याने त्या मंत्राची शक्ती संपन्न होते आणि हा मंत्र पूर्णतः शुद्ध होतो.
advertisement
Vastu Tips : घराच्या भिंतीवर 'ही' चित्रे लावा, येईल सुख-शांती अन् समृद्धी, यश घेईल पायाशी लोळण
मान्यता अशी आहे की ॐ शिवाय कोणताही मंत्र फलदायी ठरत नाही. ॐ शब्द लावल्याने त्या मंत्राची शक्ती कैकपटीने वाढते. दुसरी एक मान्यता अशी आहे की जर आपण कोणत्याही मंत्राचा जप करण्यापूर्वी ॐ लावतो, तेव्हा तो मंत्र जप करतान झालेली चूक ही मान्य राहात नाही. ती चूक ॐ शब्द लावल्याने शुद्ध होते. ॐ शब्दचा वापर केल्याने मंत्र उच्चारणावेळी जर काही व्यक्तीकडून काही अशुद्धी राहिली असेल तर त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा दोष लागत नाही, असे ही अनिकेत शास्त्री सांगतात.
प्रत्येक मंत्राआधी ॐ लावले जाते, त्यानंतरच मंत्राची सुरुवात होते. यामागे बरीच कारणे आहेत, ज्यांच्या उल्लेख शास्त्रांत केलेला आहे. भगवद्गीतेत सांगितल्यानुसार मंत्रा आधी ॐ लावणे पूण्यकारक असते. ॐ लावून कोणत्याही मंत्राचा जप केला तर त्या मंत्राची शुद्धी होते. मंत्रोच्चारणात गती येते आणि तो मंत्र सिद्ध होतो. मंत्राची शक्ती ॐ लावल्याने कैकपट वाढते. ॐ मध्ये सर्व वेदांचे धर्मशास्त्रांचे सार सामावले आहे. अशा स्थितीत मंत्राआधी ॐ लावणे म्हणजे सर्व धर्मशास्त्रांचे पठण केल्यासारखे आहे. तसेच ॐ लावून मग मंत्र पठण केल्याने इच्छापूर्ती होते.
केवळ सनातन धर्मच नव्हे तर भारतातील इतर धार्मिक तत्त्वज्ञानांनीही ॐ या शब्दाचे महत्त्व मान्य केले आहे. बौद्ध तत्वज्ञानात, मणिपदमेहुमचा वापर मोठ्या प्रमाणावर जप आणि उपासनेसाठी केला जातो. या मंत्रानुसार, ॐ मणिपूर चक्रात स्थित मानले जाते. हे चक्र दहा पाकळ्या असलेल्या कमळासारखे आहे. जैन तत्त्वज्ञानातही ओमचे महत्त्व सांगण्यात आले आहे. महात्मा कबीरांनीही ॐचे महत्त्व मान्य केले आणि त्यावर साखियां लिहिली. गुरु नानकजींनीही ॐ चे महत्त्व सांगितले आहे.
असे मानले जाते की, ॐ न लावता केलेल्या मंत्रोचारणाचा कोणताही लाभ होत नाही. ॐ न लावता मंत्र जप केल्याने तो शुद्ध मानला जात नाही. ॐ सोबत मंत्र जप केल्याने मनोकामना पूर्तीसाठी श्रेष्ठ मानले जाते. या कारणामुळे प्रत्येक मंत्राआधी बोलले जाते ॐ, असं अनिकेत शास्त्री सांगतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)