Pitru Paksha 2025: महाळाचा महिना! पितृपंधरवडा सुरू असल्यानं अमावस्येपर्यंत काय करावं-काय टाळावं
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Pitru Paksha 2025: भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंतचा हा 15 दिवसांचा काळ असतो. या काळात आपल्या पितरांचे ऋण फेडणे, त्यांच्या आत्म्यांना शांती मिळवून देणे आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करणे, हे मुख्य उद्दिष्ट असते.
मुंबई : पूर्वजांची कृपा असल्याशिवाय कुटुंबात सुख राहत नाही, असे मानले जाते. हिंदू धर्मात पूर्वजांना पितृदेव मानलं जातं. पितृपक्ष हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा काळ आहे. या पंधरा दिवसांच्या काळात पूर्वजांचे म्हणजेच पितरांचे स्मरण करून त्यांच्यासाठी श्राद्ध-तर्पण विधी केले जातात. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंतचा हा 15 दिवसांचा काळ असतो. या काळात आपल्या पितरांचे ऋण फेडणे, त्यांच्या आत्म्यांना शांती मिळवून देणे आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करणे, हे मुख्य उद्दिष्ट असते.
पितृपक्षाचे धार्मिक महत्त्व -
हा काळ आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी केलेल्या त्यागाचे आणि योगदानाचे स्मरण करून देतो. त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची ही एक संधी आहे. हिंदू धर्मानुसार, मृत्यूनंतर आत्म्याचा पुढील प्रवास सुलभ व्हावा यासाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान करणे महत्त्वाचे मानले जाते. पितृपक्षात केलेल्या या विधींमुळे पितरांच्या आत्म्यांना शांती मिळते, अशी श्रद्धा आहे. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत पितृदोष असतो, त्यांना पितृपक्षात श्राद्ध विधी केल्याने त्या दोषातून मुक्ती मिळते, असे मानले जाते. पितरांना संतुष्ट केल्याने त्यांचे आशीर्वाद मिळतात, ज्यामुळे कुटुंबात सुख-समृद्धी, आरोग्य आणि शांतता नांदते.
advertisement
पितृपक्षात काय करावे?
आपल्या पितरांच्या तिथीनुसार श्राद्ध करावे. श्राद्धाच्या दिवशी पितरांसाठी नैवेद्य तयार करावा. तसेच, तर्पण (पाणी अर्पण करणे) करून त्यांना श्रद्धांजली वाहावी. गहू किंवा तांदळाच्या पिठाचा पिंड (गोळा) तयार करून तो पितरांना अर्पण केला जातो. हा विधी मुख्यत्वे पवित्र तीर्थक्षेत्रांमध्ये केला जातो.
advertisement
ब्राह्मणांना, गरिबांना किंवा गरजूंना अन्न, वस्त्र, किंवा अन्य वस्तूंचे दान करावे. पितरांना अर्पण केलेला नैवेद्य गाय, कुत्रा किंवा कावळ्यांना खायला घालावा. शक्य असल्यास पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे आणि पितरांसाठी तर्पण करावे. या काळात सात्विक आहार घ्यावा. कांदा, लसूण आणि मांसाहार टाळावा. कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा आदर करावा आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावे.
पितृपक्षात कोणत्या गोष्टी टाळाव्या?
पितृपक्षात काही गोष्टी करणे वर्ज्य मानले जाते, ज्यामुळे पितर नाराज होऊ शकतात. या काळात लग्न, मुंज, गृहप्रवेश, नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करणे, असे कोणतेही शुभ कार्य करणे टाळावे. पूर्ण 16 दिवस मांसाहार, मद्यपान आणि इतर तामसिक पदार्थ खाणे टाळावे. नवीन कपडे, विशेषतः गडद रंगाचे, परिधान करणे टाळावे. अनेक लोक या काळात केस किंवा दाढी कापत नाहीत. कुटुंबात किंवा इतरांशी वाद घालणे टाळावे. शांत आणि संयमी राहावे. हा काळ भोगविलासासाठी नसून, तो पितरांच्या स्मरण आणि आदरासाठी आहे हे लक्षात ठेवावे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 09, 2025 2:40 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Pitru Paksha 2025: महाळाचा महिना! पितृपंधरवडा सुरू असल्यानं अमावस्येपर्यंत काय करावं-काय टाळावं