जालना : महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा असलेला मकर संक्रांत हा सण आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. 15 जानेवारीला मकर संक्रांत साजरी होणार आहे. नवीन वर्षातील हा पहिला सण महिला मोठ्या उत्साहात साजरा करत असतात. मात्र नुकतंच लग्न झालेल्या महिला पहिली संक्रांत सासरी साजरी करत नाहीत. यामागे काय शास्त्रीय कारण आहे? मकर संक्रांतीला काळी वस्त्र का धारण करतात? याबद्दलच जालन्यातील ज्योतिष तज्ज्ञ डॉक्टर राजेश महाराज सामनगावकर यांनी माहिती दिली आहे.
advertisement
का साजरी करत नाहीत संक्रांत?
ज्या स्त्रिया लग्न होऊन सासरी येतात आणि पहिली मकर संक्रांत स्त्रियांची असते त्या पहिली मकर संक्रांत सासरी साजरी करत नाहीत. यामागे कारण पहिली जी मकर संक्रांत असते या संक्रांतीला स्त्रियांना वंशा असतो. ज्या स्त्रियांची पहिली संक्रांत आहे त्यांच्या अखंड सौभाग्यासाठी त्यांनी ती सासरी साजरी करू नये. सासरवरून संपूर्ण वाणाचे सामान घेऊन तसेच वस्त्र घेऊन माहेरी जावे आणि तेच वस्त्रे परिधान करून संक्रांत साजरी करावी. पैसा हा पुढे चालवण्यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी ऊस, बोर, जाब, कणीस या प्रकारे मानाचे सामान घ्यावं सगळे घ्यावे आणि या प्रकारे मकर संक्रांत माहेरी साजरी करावी. यामुळे स्त्रीला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते आणि वंशा सुरू राहतो, असं राजेश महाराज सामनगावकर यांनी सांगितलं.
Makar Sankranti : दरवर्षी मकर संक्रांती एकाच तारखेला का? कॅलेंडरच आहे खरं कारण
मकर संक्रांतीला काळी वस्त्र का धारण करतात?
मकर संक्रांतीपासून सूर्य हा उत्तरायणमध्ये जातो. दक्षिणायन संपून उत्तरायणमध्ये सूर्याने प्रवेश केल्यानंतर उन्हाळा सुरू होतो. आपल्या संसाराला कुणाची ही काळी नजर लागू नये म्हणून संक्रांतीच्या दिवशी काळी वस्त्रे धारण करण्याची परंपरा आहे. उन्हाळ्याचा पहिला दिवस असल्याने काळ्या कपड्यांमध्ये ऊन शोषून घेण्याची क्षमता अधिक असते. त्यामुळे देखील काळे कपडे घालायला प्राधान्य दिलं जातं मात्र ही एक वैज्ञानिक कारण आहे. शास्त्रानुसार संसाराला कुणाची नजर लागू नये म्हणून काळे कपडे परिधान करण्याची परंपरा आहे,असंही राजेश महाराज सामनगावकर यांनी सांगितलं.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)





