Makar Sankranti : दरवर्षी मकर संक्रांती एकाच तारखेला का? कॅलेंडरच आहे खरं कारण
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
हिंदू संस्कृतीतील मकर संक्रांती हा एकमेव असा सण आहे जो तारीख फार बदलत नाही.
advertisement
advertisement
advertisement
मकर संक्रांतीला शास्त्रीय महत्त्व आहे. या दिवसाच्या काही काळ आधी रात्र मोठी असते आणि दिवस लहान असतो. मकर संक्रांती नंतर रात्री लहान दिवस मोठा होत जातो. तसेच संक्रांतीनंतर ऋतूबदल होण्यास सुरुवात होते. हवेतील गारवा कमी होऊन उष्णता वाढायला लागते. उत्तरायण जरी सुरू झाले असले तरी सुरवातीला काही दिवस थंडी राहाते व नंतर उन्हाळा सुरु होतो.
advertisement
या काळामध्ये मुंज, लग्न कार्य होतात. हा देवांचा दिवस मानला जातो. देवांचा दिवस संपल्यानंतर रात्र सुरु असते. त्यानंतर मकर संक्रात सुरु होते. सण साजरा करताना ऋतूमानामध्ये बदल होतो. त्या अनुषंगाने काही दानधर्म सांगितले आहेत. संक्रांत हा थंडीचा अतिउच्च काळ असतो. त्यामुळे या काळात तीळ भक्षण करणं शरीरासाठी महत्वाच सांगितलं आहे, असेही मारटकर सांगतात.
advertisement
मकर संक्रात म्हणजे काय तर सूर्य मकर राशीत प्रवेश करण्याचा एक क्षण आहे. 12 राशी मध्ये विशेष करून भारताला मकर राशीतल सूर्याचं भ्रमन हे महत्वाचं ठरतं. भौगोलिक स्तिथी जर पाहिली तर मकर राशीतला सूर्य प्रवेश म्हणजे उत्तरायण सुरु होतं. धर्म शास्त्रात उत्तरायणला विशेष महत्व आहे. सहा महिन्याचं उत्तरायण हे 21 डिसेंबर ते 21 जून असं असतं. या सहा महिन्यांचं शुभ कार्यासाठी महत्वाचं सांगितलं आहे.
advertisement
संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते. त्याचे कारण म्हणजे सूर्य या दिवसात दक्षिण ते उत्तर गोलार्धात फिरत असतो. यामुळे देवतांच्या दिवसांची सुरुवात होते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दार उघडते. म्हणूनच या दिवशी केलेले पुण्य व दान हे इतर दिवशी केलेल्या दानापेक्षा अधिक फलदायी असते, असे ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर सांगतात. (प्राची केदारी, प्रतिनिधी)