TRENDING:

सप्टेंबर महिन्यातलं चंद्रग्रहण भारतातून दिसेल का? जाणून घ्या ग्रहणाचा कालावधी

Last Updated:

भारतात ग्रहणाचा कालावधी, त्याचे वेध पाळणं याला विशेष महत्त्व असतं. त्यामुळेच सप्टेंबर महिन्यात होणारं हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे का हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. हे चंद्रग्रहण खंडग्रास स्वरूपाचं असेल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. भारतीय पंचांगानुसार ते अशुभ मानलं जातं. यंदाच्या वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण या सप्टेंबर महिन्यात होणार आहे. हे ग्रहण कोणत्या दिवशी होणार आहे, ग्रहणाचा कालावधी किती असेल व आपल्याकडे ते दिसेल का?
News18
News18
advertisement

Tulsi Plant Benefits: घरात तुळस लावण्याचे हे आहेत चमत्कारीक फायदे! पैशांच्या सर्व अडचणी होतील दूर

या वर्षीचं शेवटचं चंद्रग्रहण सप्टेंबर महिन्यात होणार आहे. धार्मिक समजुतींनुसार ग्रहण अशुभ समजलं जातं. राहू चंद्राला ग्रासतो, तेव्हा चंद्रग्रहण होतं, असा समज आहे; मात्र चंद्र व सूर्य यांच्यामध्ये पृथ्वी आली, की सूर्याचा प्रकाश चंद्रापर्यंत पोहोचू शकत नाही व त्याला ग्रहण लागतं असं विज्ञान सांगतं.

advertisement

भारतात ग्रहणाचा कालावधी, त्याचे वेध पाळणं याला विशेष महत्त्व असतं. त्यामुळेच सप्टेंबर महिन्यात होणारं हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे का हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. हे चंद्रग्रहण खंडग्रास स्वरूपाचं असेल.

यंदाचं शेवटचं चंद्रग्रहण 18 सप्टेंबर 2024 रोजी म्हणजेच भाद्रपद पौर्णिमेला होणार आहे. भारतीय वेळेनुसार, हे ग्रहण 18 सप्टेंबरला सकाळी 6.11 मिनिटांनी सुरू होईल व सकाळी 10.17 मिनिटांनी संपेल. एकूण चार तास सहा मिनिटांचं हे ग्रहण असेल. या ग्रहणाचं सुतक लागणार नाही. कारण हे ग्रहण आपल्याकडे दिवसा असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, उघड्या डोळ्यांनी दिसणाऱ्या ग्रहणाचं सुतक पाळलं जातं. हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही. त्यामुळे त्याचं सुतकही पाळण्याची आवश्यकता नसते.

advertisement

चंद्रग्रहण सुरू होण्याआधी नऊ तास आधी सुतक काळ सुरू होतो. त्या काळात कोणतंही धार्मिक कार्य केलं जात नाही; मात्र 18 सप्टेंबरला होणारं ग्रहण भारतातून दिसणार नसल्याचं त्याचं सुतकही पाळलं जाणार नाही.

या महिन्यातलं चंद्रग्रहण उत्तर-दक्षिण अमेरिका, युरोप, आफ्रिका, हिंदी महासागर, आर्क्टिक व प्रशांत महासागर, अंटार्क्टिका आणि अटलांटिक महासागर इथून दिसेल. चंद्रग्रहणाचा राशींवरही प्रभाव पडतो. हे ग्रहण भारतातून दिसणार नसलं तरी काही राशींच्या व्यक्तींवर चंद्रग्रहणाचा विशेष प्रभाव पडलेला दिसून येईल. या महिन्यातल्या चंद्रग्रहणामुळे मेष, कर्क, तूळ आणि मकर राशीच्या व्यक्तींनी सावध राहण्याची आवश्यकता आहे.

advertisement

Hartalika 2024: का करतात हरतालिका व्रत? तारीख आणि शुभ वेळ जाणून घ्या

यंदाचं पहिलं चंद्रग्रहण मार्च महिन्यात झालं होतं. आता दुसरं चंद्रग्रहण 18 सप्टेंबर रोजी होणार आहे. मात्र ते भारतातून दिसणार नसल्याने त्याचं सुतक पाळण्याची आवश्यकता नाही.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

advertisement

मराठी बातम्या/अध्यात्म/
सप्टेंबर महिन्यातलं चंद्रग्रहण भारतातून दिसेल का? जाणून घ्या ग्रहणाचा कालावधी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल