हे चित्र फक्त घराच्या सजावटीसाठी नसतं. उज्जैनचे आचार्य आनंद भारद्वाज यांनी सांगितलं की, वास्तुशास्त्रानुसार, धावणाऱ्या घोड्यांचे चित्र प्रगती आणि चांगल्या नशिबासाठी खूप शुभ मानले जाते. अनेक लोक हे चित्र आपल्या व्यवसायाच्या ठिकाणीही लावतात. मात्र, ते लावण्याचे काही नियम आहेत, तरच तुम्हाला त्याचा फायदा मिळेल. जर तुम्ही ते चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीच्या दिशेने लावले, तर घर किंवा व्यवसायाच्या ठिकाणी नकारात्मक प्रभाव वाढू शकतो. कारण, हे चित्र ऊर्जा आकर्षित करते.
advertisement
हे चित्र का लावले जाते?
शास्त्रानुसार, धावणारे घोडे यश, प्रगती आणि सामर्थ्याचे प्रतीक आहेत. असं मानलं जातं की, अशा प्रकारचं चित्र आपल्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी लावल्याने व्यक्तीमध्ये धैर्य, समज, संयम, बुद्धिमत्ता, अध्यात्म, प्रेम, आनंद, ज्ञान, शुद्धता यांसारखे गुण येतात. यामुळे व्यक्तीला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळते. घर किंवा कामाच्या ठिकाणी हे चित्र लावल्याने कामाला गती मिळते आणि अडचणी दूर होतात.
विशेषतः, उत्तर किंवा पूर्वेकडील दिशेला हे चित्र लावल्याने धन, समृद्धी आणि करिअरमध्ये प्रगतीची शक्यता वाढते. हे चित्र व्यक्तीची इच्छाशक्ती मजबूत करते आणि जीवनात नवीन संधी आणण्यास मदत करते.
हे चित्र लावताना या गोष्टी लक्षात ठेवा
- घोडे धावलेले असावेत. उभ्या घोड्यांचे चित्र लावू नका.
- याशिवाय, घोडे निरोगी, सुंदर आणि उत्साही दिसले पाहिजेत.
- चित्राची दिशा किंवा घोड्यांचे तोंड नेहमी घराच्या आतल्या बाजूला असावे.
तुमच्या घरात हे चित्र आहे का? जर नसेल, तर वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार ते लावून तुम्हीही तुमच्या जीवनात सकारात्मक बदल अनुभवू शकता!
हे ही वाचा : तुमची रास यात आहे का? जून महिन्यात 'या' 3 राशींच्या वाढणार अडचणी; कुंजकेतू योग ठरणार घातक!
हे ही वाचा : तुळशीच्या मंजिरीचा 'हा' उपाय करेल कमाल! व्हाल प्रचंड श्रीमंत आणि कधीच भासणार नाही पैशांची चणचण