तुमची रास यात आहे का? जून महिन्यात 'या' 3 राशींच्या वाढणार अडचणी; कुंजकेतू योग ठरणार घातक!
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
जून महिन्यात मंगळ सिंह राशीत प्रवेश करणार असून, केतू आधीच तिथे असल्यामुळे कुंजकेतू योग तयार होणार आहे. हा योग वृषभ, सिंह आणि वृश्चिक राशींवर विशेषतः...
ग्रहांचं राशीबदल एका ठराविक वेळी होत असतो. दर महिन्याला एखादा ग्रह आपली रास बदलतोच. पण मे महिन्यानंतर येणारा जून महिना ग्रह-नक्षत्रांच्या दृष्टीने खूपच खास असणार आहे. कारण या महिन्यात अनेक मोठे ग्रह आपली रास बदलणार आहेत. याचा परिणाम आपल्या मानवी जीवनावर आणि सगळ्या राशींवर होणार आहे. ग्रहांच्या राशीबदलामुळे शुभ आणि अशुभ योगही तयार होणार आहेत. असं मानलं जातंय की, जूनच्या सुरुवातीलाच दोन 'क्रूर' ग्रहांचा योग जुळून येणार आहे, ज्यामुळे तीन राशींवर नकारात्मक परिणाम दिसू शकतो. देवघर येथील प्रसिद्ध ज्योतिषांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे...
देवघरचे ज्योतिषी काय म्हणतात?
देवघरमधील पागल बाबा आश्रमाजवळील मुदगल ज्योतिष केंद्राचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुदगल यांनी 'लोकल 18' शी बोलताना सांगितलं की, जून महिन्यात दोन क्रूर ग्रह, मंगळ आणि केतू यांचा योग जुळून येणार आहे. 7 जून रोजी मंगळ सिंह राशीत प्रवेश करेल, जिथे केतू आधीच आहे. जेव्हा दोन क्रूर ग्रह एकत्र येतात, तेव्हा 'कुंजकेतू योग' तयार होतो, जो अशुभ मानला जातो. या योगामुळे तीन राशींवर नकारात्मक परिणाम होणार आहे. या तीन राशी म्हणजे वृषभ, सिंह आणि वृश्चिक.
advertisement
राशींवर होणारा परिणाम
वृषभ : मंगळ आणि केतूच्या या युतीमुळे वृषभ राशीच्या लोकांवर नकारात्मक परिणाम होईल. मानसिक ताण वाढू शकतो. बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवा. अनावश्यक वाद-विवादात पडू नका, नाहीतर कायदेशीर अडचणीत सापडू शकता. वडिलोपार्जित संपत्तीवरून कुटुंबात वाद होण्याची शक्यता आहे. भावंडांसोबतचे संबंध बिघडू शकतात.
सिंह : मंगळ आणि केतूचा योग सिंह राशीतच तयार होणार असल्याने, सिंह राशीच्या लोकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. करिअरमध्ये अनेक अडचणी येऊ शकतात. मुलांकडूनही चिंता वाढू शकते. नोकरी करणाऱ्यांवर कामाचा अधिक ताण येऊ शकतो. खूप धावपळ करावी लागेल. तुमची कामे अर्धवट रखडू शकतात. जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे.
advertisement
वृश्चिक : मंगळ आणि केतूच्या या युतीचा वृश्चिक राशीवर नकारात्मक परिणाम होईल. वेळेवर काम पूर्ण न झाल्यामुळे मानसिक अस्वस्थता वाढू शकते. व्यवसायात पैसे गुंतवताना खूप विचारपूर्वक निर्णय घ्या, नाहीतर आर्थिक नुकसान होऊ शकते. कुटुंबापासून दूर जावे लागण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना काळजी घ्या, दुखापत होण्याची शक्यता आहे. घरात जमिनीसंबंधी वाद होण्याची शक्यता आहे.
advertisement
यावर उपाय काय?
ज्योतिषी मुदगल यांनी यावर काही उपायही सांगितले आहेत. ते म्हणाले की, मंगळ आणि केतूच्या या युतीमुळे होणारा नकारात्मक परिणाम कमी करता येऊ शकतो. यासाठी व्यक्तीने भगवान शंकराची पूजा करावी. शिवलिंगावर गंगाजलाने अभिषेक करावा आणि पंचोपचार पद्धतीने पूजा करावी. यामुळे मंगळ आणि केतूच्या वाईट प्रभावापासून आराम मिळेल.
advertisement
हे ही वाचा : शनि जयंतीला चुकूनही करू नका 'या' चुका, नाहीतर शनिदेव होईल क्रोधीत अन् मागे लागेल साडेसाती!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 24, 2025 10:40 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
तुमची रास यात आहे का? जून महिन्यात 'या' 3 राशींच्या वाढणार अडचणी; कुंजकेतू योग ठरणार घातक!