शनि जयंतीला चुकूनही करू नका 'या' चुका, नाहीतर शनिदेव होईल क्रोधीत अन् मागे लागेल साडेसाती!
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
शनीदेव हा न्यायाचा देव आहे. शनी जयंतीला त्यांच्या पूजेमध्ये अपवित्रता, तमसिक आहार, अथवा गरिबांशी वाईट वर्तन केल्यास ते अप्रसन्न होऊ शकतात. या दिवशी...
हिंदू ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवाला 'न्यायदेवता' मानलं जातं. ते कर्माला घाबरत नाहीत आणि पदाने प्रभावित होत नाहीत. त्यांचा न्याय अभेद्य आहे. ज्याने चांगलं काम केलं, तो वर चढला; ज्याने अन्याय केला, तो खाली पडला. अशा परिस्थितीत, शनि जयंतीला केलेली पूजा तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते, पण चुकूनही तुम्ही काही चुका केल्या नाहीत तरच!
शनि जयंतीला 'या' चुका करू नका
तामसी भोजन टाळा : या दिवशी मांस, मद्य किंवा कोणत्याही प्रकारचे तामसी भोजन करणे अशुभ मानले जाते. शनि जयंतीच्या दिवशी फक्त सात्विक आणि शुद्ध शाकाहारी भोजन करा.
घाण तेल दान करू नका : तेलाचं दान करणं शुभ मानलं जातं, पण घाण किंवा जुनं तेल दान करणं वर्जित आहे. शनिदेवासाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि शुद्ध मनाने आणि हेतूने तेलाचं दान करा.
advertisement
अन्याय किंवा अपमान करू नका : गरीब, गरजू किंवा प्राणी-पक्ष्यांशी कठोर वर्तन केल्यास शनिदेव नाराज होऊ शकतात. या दिवशी शक्य तेवढी सेवा करा, इतरांना मदत करा आणि प्रत्येकाशी आदराने वागा.
शनिदेवाला प्रसन्न कसं कराल?
- पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावा.
- शनिदेवाच्या मूर्तीसमोर काळे उडीद, काळे तीळ, मोहरीचं तेल, काळे कपडे किंवा काळी छत्री दान करा.
- या गोष्टी लक्षात ठेवून शनि जयंतीला पूजा केल्यास शनिदेव नक्कीच प्रसन्न होतील आणि तुम्हाला न्यायाचा आशीर्वाद मिळेल.
advertisement
हे ही वाचा : गुरूंशिवाय यशस्वी होता येतं का? प्रेमानंद महाराजांनी सांगितले गुरु-शिष्य नात्यातील रहस्य!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 23, 2025 7:52 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
शनि जयंतीला चुकूनही करू नका 'या' चुका, नाहीतर शनिदेव होईल क्रोधीत अन् मागे लागेल साडेसाती!