TRENDING:

तुम्ही ऑफिसमधून Heart Attack घरी घेऊन जाताय; कुलकर्णी डॉक्टर म्हणाले, काही सेकंदांत होते 100% ब्लॉक मग थांबत नाही अटॅक!

Last Updated:

Heart Attack: आजच्या तरुणांमध्ये हार्ट अटॅकची प्रकरणं वेगाने वाढत असून, यामागे 70-80% ब्लॉकेजपेक्षा ‘प्लॅक रप्चर’ हे अधिक धोकादायक कारण ठरत आहे. ऑफिस स्ट्रेस, जंक फूड, स्मोकिंग, कमी झोप आणि व्यायामाचा अभाव यामुळे हा सायलेंट किलर मूकपणे वाढतोय, असा डॉक्टरांचा इशारा आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

आजच्या तरुणांमध्ये हार्ट अटॅकची संख्या झपाट्याने वाढत आहे. ऑफिस स्ट्रेस, झोपेची कमतरता, धकाधकीचे जीवन, जंक फूड आणि स्मोकिंग यामुळे केवळ हृदयाच्या रक्तवाहिन्या कमकुवत होत नाहीत, तर त्यामध्ये तयार होणारा unstable plaque सर्वात घातक ठरत आहे. अनुभवी कार्डिओलॉजिस्ट डॉ. रवींद्र एल. कुलकर्णी यांनी नुकताच दिलेला इशारा तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आज बहुतेक हार्ट अटॅक 70-80% ब्लॉकेजमुळे नाही… तर ‘plaque rupture’ मुळे होत आहेत.

advertisement

प्लॅक म्हणजे नेमकं काय आणि का धोकादायक?

हृदयाच्या धमन्यांच्या भिंतींमध्ये LDL (वाईट कोलेस्टेरॉल), चरबी, सूज आणि इतर घटक मिसळून soft plaque तयार होतं. हे दिसायला लहान असलं तरी अत्यंत अस्थिर असतं.

AHA/ACC 2024 च्या मते, हे प्लॅक जर अचानक फाटलं (rupture) तर काही सेकंदांतच platelet-rich clot तयार होतो आणि 3040% ब्लॉकेज असलेली artery देखील पूर्ण 100% बंद होऊ शकते. यामुळेच अगदी फिट आणि हेल्दी दिसणाऱ्या तरुणांनाही अचानक हार्ट अटॅक येतो.

advertisement

advertisement

LDL आणि ट्रायग्लिसराइड्स प्लॅक ‘unstable’ का करतात?

NEJM 2022 च्या संशोधनानुसार...

High LDL म्हणजे plaque अधिक मऊ, fragile आणि तुटण्यास सोपं.

High triglycerides म्हणजे plaque मध्ये सूज वाढणे (inflammation).

advertisement

हे दोन्ही घटक मिळून plaque तुटण्याची शक्यता अनेक पटींनी वाढवतात.

तरुणांमध्ये plaque rupture जास्त होण्याची प्रमुख कारणे

डॉ. कुलकर्णी यांच्या मते, आजची जीवनशैलीच तरुणांना हार्ट अटॅकच्या उंबरठ्यावर आणत आहे.

ऑफिस स्ट्रेस आणि overworking

Smoking आणि Vaping

जंक फूड + high cholesterol

कमी झोप आणि अनियमित जीवन

व्यायामाचा पूर्ण अभाव

यामुळे plaque अत्यंत अस्थिर, fragile आणि अचानक फाटण्यास तयार होत जातो.

Plaque rupture → clot → अचानक 100% block

प्लॅक एकदा फाटला की रक्तातील platelet त्या ठिकाणी झपाट्याने चिकटतात व clot तयार होतो. काही क्षणांतच 100% block तयार होऊन अचानक हार्ट अटॅक येतो.

हेच कारण असंख्य तरुणांचे “reports normal होते”…

फक्त हलकं दुखत होतं”…

जिममध्ये perfectly fine होतो…”

असं असूनही अचानक heart attack किंवा cardiac arrest होतो.

टाइमली उपचारच जीव वाचवण्याचं खरं हत्यार

Early arrival → thrombolysis clot तोडू शकते

Angioplasty → sudden block असताना life-saving

Late arrival हृदयाचे स्नायू मोठ्या प्रमाणात नष्ट

प्रगत तपासण्या (IVUS/OCT) plaque ची वस्तुस्थिती अधिक स्पष्ट दाखवतात.

Plaque stable ठेवण्यासाठी काय करणे अत्यावश्यक?

LDL 70 पेक्षा कमी

Smoking/vaping पूर्णपणे बंद

रोज कमीत कमी 3040 मिनिटे व्यायाम

7–8 तासांची गुणवत्तापूर्ण झोप

वजन नियंत्रण

Statins (वैज्ञानिकदृष्ट्या plaque स्थिर करतात JACC 2021)

विशेष काळजी घ्यावी

कुटुंबात तरुण वयात हार्ट डिसीजचा इतिहास

डायबिटीज, स्थूलता, fatty liver

High triglycerides / High ApoB

तणावानंतर छातीत जडपणा

sedentary lifestyle

प्रश्न blockage किती आहे हा नाही… तो stable आहे की नाही, हे अधिक महत्त्वाचे, असे डॉ. कुलकर्णी सांगतात. आज तरुणांमध्ये 3040% blockage असूनही अचानक 100% block होऊन हार्ट अटॅक होतोय. हाच silent killer सर्वात मोठा धोका निर्माण करतो आहे. डॉ. कुलकर्णी यांच्या मते, जर ही माहिती वेळेत कोणापर्यंत पोहोचली; तर एक share एखाद्याचं आयुष्य वाचवू शकतो.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याची आवक वाढली, पण दर घसरलेलेच, सोयाबीन आणि मक्याला काय मिळाला भाव?
सर्व पहा

मराठी बातम्या/science/
तुम्ही ऑफिसमधून Heart Attack घरी घेऊन जाताय; कुलकर्णी डॉक्टर म्हणाले, काही सेकंदांत होते 100% ब्लॉक मग थांबत नाही अटॅक!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल