क्रिकेट ऑस्ट्रेलियाने व्यक्त केला शोक
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बेन ऑस्टिनच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले आहे की, नेटमध्ये फलंदाजी करताना झालेल्या अपघातात 17 वर्षीय मेलबर्न क्रिकेटर बेन ऑस्टिनच्या निधनाने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला धक्का बसला आहे. याशिवाय, क्रिकेट व्हिक्टोरियानेही बेनच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
नेमका मृत्यू कसा झाला?
advertisement
मंगळवारी ऑस्टिन फर्न्ट्री गली येथे क्रिकेट नेटमध्ये सराव करत असताना ऑटोमॅटिक बॉलिंग मशीनमधून एक चेंडू त्याच्या डोक्यावर किंवा मानेवर लागला. असे मानले जाते की त्याने हेल्मेट घातले होते. हे चेंडू जवळजवळ 11 वर्षांपूर्वी शेफील्ड शिल्ड सामन्यादरम्यान फिल ह्यूजेसला झालेल्या दुखापतीसारखेच होते, ज्यामुळे दोन दिवसांनी त्याचा मृत्यू झाला.
ऑस्टिन लाईफ सपोर्टवर होता
स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 6:00 वाजताच्या सुमारास आपत्कालीन पथकांना घटनास्थळी बोलावण्यात आले आणि ऑस्टिनला गंभीर अवस्थेत मोनाश चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्याला लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले होते परंतु बुधवारी त्याचा मृत्यू झाला. फर्न्ट्री गली क्रिकेट क्लबने म्हटले आहे की ते त्यांच्या खेळाडूच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत आहेत आणि क्रिकेट जगताला धक्का बसला आहे.
फिल ह्यूजेसचाही चेंडू लागल्याने मृत्यू झाला
2014 मध्ये शेफील्ड शील्डमध्ये फलंदाजी करताना मानेला मार लागल्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिल ह्यूजेसचा मृत्यू झाल्यानंतर बरोबर एक दशकानंतर ही घटना घडली आहे. त्याच्या मृत्यूमुळे खेळाडूंसाठी सुरक्षा उपकरणांमध्ये सुधारणा झाली. फिल ह्यूजेसचा उल्लेख करताच क्रिकेट इतिहासातील सर्वात दुःखद अपघातांपैकी एकाची आठवण येते. नोव्हेंबर 2014 मध्ये, ऑस्ट्रेलियाचा आशादायक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू फिलिप जो ह्यूजेसला शेफील्ड शील्ड सामन्यादरम्यान शॉन अॅबॉटच्या बाउन्सरने मानेला दुखापत झाली. त्याला रुग्णालयात नेण्यात आले पण दोन दिवसांनी त्याचे निधन झाले. त्या अपघाताने केवळ ऑस्ट्रेलियाच नाही तर संपूर्ण क्रीडा जगताला धक्का बसला. 11 वर्षांनंतर, अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. 17 वर्षीय आशादायक ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू बेन ऑस्टिनचाही फिल ह्यूजेसप्रमाणेच मानेला चेंडू लागून मृत्यू झाला.
