अभिनेत्रीने इंडियन प्रीमियर लीगमधील पराभव असूनही आपल्या टीमच्या उत्कृष्ट कामगिरीचं कौतुक केलं. प्रीती झिंटाचं म्हणणं आहे की, जरी टीम फायनलमध्ये पराभूत झाली असली, तरी त्यांनी संपूर्ण स्पर्धेत जिद्द, संयम आणि जोशसह शानदार कामगिरी केली. प्रीती झिंटाने पंजाब किंग्सचा एक फोटो शेअर करत त्याखाली आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी या हंगामाला आपल्या दृष्टीने खास असल्याचं सांगितलं.
advertisement
अभिनेत्रीने लिहिलं, ‘टीम आणि कॅप्टनने जबरदस्त नेतृत्व दाखवलं. नव्या भारतीय खेळाडूंनी आपल्या टॅलेंटने सर्वांचं मन जिंकलं. यंदा खूपशा अडचणी आल्या, जसं की – काही महत्त्वाच्या खेळाडूंच्या दुखापती, राष्ट्रीय जबाबदाऱ्यांमुळे खेळाडूंना अनुपस्थित राहावं लागणं, स्पर्धेतील व्यत्यय, घरच्या मैदानांऐवजी इतर राज्यांमध्ये सामने खेळणं आणि रिकाम्या स्टेडियममध्ये सामने खेळणं. तरीही टीमने हार मानली नाही आणि दशकानंतर गुणतालिकेत शानदार स्थान मिळवलं. फायनलमध्ये अखेरच्या चेंडूपर्यंत टीमने तगडा सामना दिला.’
प्रीती झिंटाचा चाहत्यांना दिलेला शब्द
अभिनेत्रीने आपल्या खेळाडू, स्टाफ आणि फॅन्सचे आभार मानत पुढे लिहिलं, ‘आमच्या टीमने संपूर्ण स्पर्धेत जबरदस्त धैर्य दाखवलं. आमचे फॅन्स, ज्यांना आम्ही ‘शेर स्क्वॉड’ म्हणतो, त्यांनी प्रत्येक कठीण वेळी आमच्या पाठीशी उभं राहत ताकद दिली. आम्ही जे काही आहोत, ते तुमच्यामुळेच. प्रीती झिंटाने वचन दिलं की पंजाब किंग्स पुढच्या वर्षी अधिक ताकदीनं परत येईल. तिने फॅन्सना सांगितलं, आमचं काम अजून अपूर्ण आहे. पण आम्ही ते पूर्ण करण्यासाठी नक्की परत येऊ. पुढच्या वर्षी स्टेडियममध्ये भेटू. तोपर्यंत सुरक्षित रहा आणि स्वतःची काळजी घ्या.
बॉलिवूडनेही RCB चा विजय साजरा केला
आयपीएलच्या अंतिम सामन्यात RCB ने पंजाब किंग्सचा पराभव करत ट्रॉफी आपल्या नावावर केली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या या अंतिम सामन्यात RCB ने पंजाब किंग्सवर 6 धावांनी विजय मिळवला. या विजयामुळे टीम आणि क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड आनंद पाहायला मिळाला. बॉलिवूडनेही हा विजय सोशल मीडियावर साजरा केला.