वन मोर रन टू गेट अँड देन ऑस्ट्रेलिया....
गेल्या दोन वर्षापासून पोरींनी केलेल्या मेहनतीचं ते फळ आहे. ड्रेसिंग रुममध्ये केलेलं वाक्य हे माझ्या हृदयातून आलं होतं. वन मोर रन टू गेट अँड देन ऑस्ट्रेलिया इन द फायनल्स... आम्ही सराव करत होतो, तेव्हा आम्ही 2 नोव्हेंबरसाठी करत होतो. तो दिवस माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस असेल. माझा वाढदिवस 11 नोव्हेंबरला असतो अन् त्याचं गिफ्ट मला हरमन आणि कंपनीने दिलं आहे, असं अमोल मुजुमदार म्हणाले.
advertisement
दोन महिन्यापासून सोशल मीडिया बंद
गेल्या 13 वर्षापासून सुरू झालेला प्रवास सुरू राहणार का? असा सवाल विचारल्यावर अमोल मुजुमदार यांनी सांगितलं की, पुढे आणखी खूप मोठ्या लढाया आहेत. पण गेली दोन महिन्यापासून सोशल मीडियापासून लांब राहिलो. त्यामुळे सोशल मीडियावर काय चर्चा चालू होती, याची मला काही कल्पना नाहीये. मी माझ्या बायकोला पण सांगितलं होतं, बाहेर काय चाललंय याबद्दल मला काहीही सांगू नको, असं म्हणत अमोल मुजुमदार यांनी टीम इंडियाच्या विजयाचं सिक्रेट सांगितलं.
मी फिश फ्राय मिस करतोय
दरम्यान, मी एवढंच सांगेल की, आता फक्त ही सुरूवात आहे. यापुढे आपल्याला लहान मुलांना वेगैरे मोठं करायचं आहे. लहान मुली नक्कीच या विक्ट्रीमधून प्रोत्साहन घेतील आणि क्रिकेट खेळायला लागतील. मागील टूरपासून तुम्ही डाळ भात मिस करताय, असं विचारल्यावर मुजुमदार यांनी मी फिश फ्राय मिस करतोय, असं सांगितलं.
