Punjab vs Andhra Pradesh : क्रिकेटच्या मैदानात काही सामने असे पार पडतात हे सामने पाहून डोळ्यांवर विश्वास बसत नाही.असाच काहीसा सामना आज पाहायला मिळाला आहे. या सामन्यात 56 वर 5 विकेट पडले होते. अर्धा संघ तबूत परतला होता,पण खेळाडूने हार मानली नाही. एकटा भिडला नाबाद 109 धावांची वादळी खेळून हा सामना जिंकवला आहे.त्यामुळे हा सामना पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
advertisement
सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत हा सामना पार पडला होता.या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 205 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना आंध्रप्रदेशचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाले होते.त्यानंतर मारामरेड्डी हेमंथ रेड्डी मैदानात आला होता. हा रेड्डी जेव्हा मैदानात आला तेव्हा देखील एका मागून एक विकेट पडत होते. त्यामुळे आंध्रप्रदेशची 56 वर 5 विकेट अशी विचित्र अवस्था झाली होती. आणि अर्धा संघ तंबुत परतला होता.
आता हा स्कोरबोर्ड पाहून कुणालाही वाटलं असेल आंध्रप्रदेश हा सामना हारेल. पण तसे अजिबात घडले नाही आणि मारामरेड्डी हेमंथ रेड्डी आणि प्रसाद या दोन खेळाडूंना चमत्कार करून दाखवला. दोघांनी मैदानात टीचून फलंदाजी केली.या दरम्यान मारामरेड्डी हेमंथ रेड्डी याने 53 बॉलमध्ये 109 धावांची वादळी खेळी केली.या खेळीत 7 षटकार आणि 11 चौकार मारले होते. या दरम्यान त्याचा स्ट्राई रेट 205 होता.त्याच्या जोडीला प्रसादने 35 बॉलमध्ये 53 धावांची खेळी केली होती.या दोघांच्या नाबाद खेळीमुळे आंध्रप्रदेशने हा सामना 5 विकेटने जिंकला आहे. दरम्यान पंजाबकडून गुरनुर ब्रारने 3 तर आयुष गोयल आणि हरप्रीत ब्रारने 1 विकेट काढली होती.
तर प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 205 धावा ठोकल्या होत्या. पंजाबकडून एकाही खेळाडूने अर्धशतक ठोकलं नाही. पण हरनुर सिंहच्या 42,अनमोल प्रित सिंहच्या 47, सलील अरोराच्या 42 आणि रमनदिप सिंहच्या 46 धावांच्या बळावर पंजाबने 205 धावा केल्या होत्या. आंध्रप्रदेशकडून नितिश रेड्डी, सत्यनारायण राजू,सौरभ कुमार, पृथ्वी राज याराने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.
