नंबर वन टी-ट्वेंटी बॉलर
ओमानविरुद्धच्या मॅचमध्ये जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती यांना आराम देण्यात आला होता. आता हे दोघेही पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये परततील. हे दोन्ही खेळाडू टीमचा महत्त्वाचा भाग आहेत. वरुण चक्रवर्ती हा जगातील नंबर वन टी-ट्वेंटी बॉलर आहे, तर जसप्रीत बुमराहचा बॉलर्सवर कायमच दबाव असतो.
संजू सॅमसनची बॅटिंग पोझिशन
advertisement
बॅटिंगमध्ये शुभमन गिल याची कामगिरी मागच्या दोन मॅचमध्ये खराब असली तरी, त्याला बाहेर काढले जाण्याची शक्यता नाही. मात्र, संजू सॅमसनची बॅटिंग पोझिशन पाहणे महत्त्वाचे ठरेल. त्याने मागच्या वर्षी टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये ओपनिंगला येत तीन शतक ठोकली होती. ओमानविरुद्ध तो तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला आला आणि त्याने 56 धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याला वरच्या क्रमांकावर पाठवले जाऊ शकते. हार्दिक पांड्या, अक्षर पटेल आणि शिवम दुबे हे तीन ऑलराऊंडर म्हणून टीममध्ये कायम असतील. कुलदीप यादवच्या समावेशावर कोणताही प्रश्नचिन्ह नाही.
सूर्यकुमारची धास्ती
दरम्यान, सूर्यकुमार यादव आता पाकिस्तानविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर खेळणार आहे. ओमानविरुद्ध सूर्यकुमार 11 व्या नंबरचा फलंदाज होता. अशातच आता पाकिस्तानने सूर्यकुमारची धास्ती घेतली आहे. त्यामुळे आता टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन पुन्हा जुन्या रांगेत येणार, हे फिक्स झालंय.
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - अभिषेक शर्मा, शुभमन गिल, संजू सॅमसन (WK), सूर्यकुमार यादव (C), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, शिवम दुबे, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती.