TRENDING:

VIDEO : बुमराहपेक्षा घातक, बॅटसमन अक्षरशः जमिनीवर लोळला,उठायला 2 मिनिटं गेली, मैदानात काय घडलं?

Last Updated:

या सामन्यात टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहपेक्षा घातक गोलंदाजी करण्यात आली होती. या गोलंदाजीसमोर बॅटसमनला अक्षरश: गुडघे टाकण्यास भाग पाडल होते.या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ashes 2025-26 australia vs england
ashes 2025-26 australia vs england
advertisement

Australia vs England 1st Test :ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सूरू असलेला अॅशेस टेस्ट मालिकेचा पहिला टेस्ट रोमांचक स्थितीत पोहोचला आहे. कारण आज इंग्लंडचा पहिला डाव 172 धावांवर ऑल आऊट झाल्यानंतर आता ऑस्ट्रेलिया देखील ऑल आऊट उंबरठ्यावर पोहोचली आहे. त्यामुळे सामना रोमांचक स्थितीत आहे. अशात या सामन्या दरम्यान एक भयानक घडली. या सामन्यात टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहपेक्षा घातक गोलंदाजी करण्यात आली होती. या गोलंदाजीसमोर बॅटसमनला अक्षरश: गुडघे टाकण्यास भाग पाडल होते.या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे.त्यामुळे मैदानात नेमकं काय घडलं आहे? हे जाणून घेऊयात.

advertisement

खरं तर अॅशेस कसोटी मालिकेच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने भेदक गोलंदाजी करून एकट्याने इंग्लंडचे सात फलंदाज तंबुत पाठवले होते. त्यामुळे सामना रंजक स्थितीत पोहोचला होता. यानंतर इंग्लंड ऑल आऊट झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया सामन्यावर पकड मजबूत करेल असे वाटत होते.पण इंग्लंडने जबरदस्त पुनरागमन केलं.या पुनरागमनाची सूरूवात जोफ्रा आर्चरने केली.

advertisement

जोफ्रा आर्चरने पहिल्या ओव्हरपासून जसप्रीत बुमराहसारखी गोलंदाजी करायला सुरूवात केली होती. यावेळी जोफ्रा आर्चरने पहिल्याच ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर जेक वेदराल्डला एलबीडब्ल्यू आऊट केले होते.पण अंपायरने जेकला नॉटआऊट करार केले होते. पण डीआरएसमध्ये जेकला एलबीडब्ल्यू आऊट केले होते.पण या दरम्यान एक घटना घडली जी कुणाच्या लक्षात आली नाही ती म्हणजे, जोफ्रा आर्चरने जो भेदक बॉल टाकला होता,त्या बॉलवर जेक अक्षरश: जमिनीवर पडता होता. कदाचित जेक एलबीडल्यू अपिल वाचवण्याच्या चक्करमध्ये तो जमिनीवर कोसळला होता. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे.हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा येतो आहे.

advertisement

ऑस्ट्रेलिया ऑल आऊटच्या उंबरठ्यावर

खरं तर आपल्या भेदक गोलंदाजीने इंग्लंडला अवघ्या 172 धावांवर ऑल आऊट केल्यानंतर ऑस्ट्रेलिया मैदानात दबदबा करेल असे वाटत होते. पण ज्याप्रमाणे ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांचे हाल केले.त्याचप्रमाणे इंग्लंडच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचे हाल केले आहेत. ऑस्ट्रेलिया पहिल्या दिवसअखेर 9 विकेट गमावून 123 धावांवर खेळते आहेत.ऑस्ट्रेलिया अजून इंग्लंडपासून 49 धावा दूर आहे. ऑस्ट्रेलियाकडून अॅलेक्स कॅरीने सर्वाधिक 26 धावा केल्या आहेत. या व्यतिक्त कुणालाही 25 चा आकडा गाठता आला नाही आहे. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने 5 तर जोफ्रा आर्चर आणि ब्रायडन कार्सने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या आहेत.

advertisement

प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडची सूरूवात खराब झाली होती. इंग्लंडकडून हॅरी ब्रुकने सर्वाधिक 52 धावांची अर्धशतकीत खेळी केली होती.तर ओली पोपने 46 धावा केल्या होत्या आणि जेमी स्मिथने 33 धावा केल्या होत्या.या व्यतिरीक्त कुणालाही मोठ्या धावा करता आल्या नाही. त्यामुळे इंग्लंडचा पहिला डाव 172 वर ऑल आऊट झाला होता.ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक 7 विकेट तर ब्रेंडन डोगटने 2 आणि ग्रीनने एक विकेट घेतली होती.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
‘जिमला जातो म्हणून सांगितलं अन्..' अपघातात ओमकारच्या मृत्यूने आजी ढसाढसा रडली
सर्व पहा

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : बुमराहपेक्षा घातक, बॅटसमन अक्षरशः जमिनीवर लोळला,उठायला 2 मिनिटं गेली, मैदानात काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल