खरं तर ही घटना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्या दरम्यान घडली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा नथन लॉयनने 564 विकेटस काढत एक रेकॉर्ड केला होता. विशेष म्हणजे हा रेकॉर्ड करताना लॉयनने ग्लेन मॅकग्राथचा 563 धावांचा रेकॉर्ड मोडला होता. विशेष म्हणजे नाथन लॉयन हा रेकॉर्ड मोडताना ग्लेन मॅकग्राथ कॉमेट्री बॉक्समध्ये बसले होते.यावेळी नाथन लॉयनला आपला रेकॉर्ड ब्रेक करताना पाहून ग्लेन मॅकग्राथ प्रचंड भडकले होते.यावेळी ते जागेवरून उठले आणि त्यांनी खूर्ची उचलून फेकण्याची अॅक्शन केली.
advertisement
विशेष म्हणजे ग्लेम मॅकग्राथ यांनी ही कृती रागाच्या भरात केली नव्हती.तर मजेशीर पद्धतीने त्यांनी ही कृती केली होती.या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना हसू आवरता येत नाही.
दरम्यान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात अॅशेस टेस्ट मालिका सूरू आहे.या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव हा 371 धावांवर ऑलआऊट झाला होता. इंग्लंडचा पहिला डाव हा दुसऱ्या दिवस अखेर 8 विकेट गमावून 213 धावा केल्या होत्या. या दरम्यान नाथन लॉयनने रेकॉर्ड केला होता.
