खरं तर ही घटना 57 व्या ओव्हरला घडली आहे. इंग्लंडकडून ब्रायडन कार्स गोलंदाजी करायला आला होता. यावेळी कार्सच्या चौथ्या बॉलवर स्टीव्ह स्मिथ फ्लॅट बॉल मारला होता. या बॉलवर एखादा खेळाडू आऊट होईल असे वाटणार देखील नाही. पण आगीच्या वेगाने धावणाऱ्या याच बॉलला विल जॅक्सने एका हाताने धरत भन्नाट कॅच घेतली आहे. विशेष म्हणजे ही कॅच घेतल्यानंतर जॅक्सला विश्वास देखील बसला नाही.
advertisement
या भन्नाट कॅचमुळे चांगल्या लयीत खेळत असलेला स्टीव्ह स्मिथ 61 धावांवर बाद झाला होता. या कॅचचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.यासोबतच ब्रायडन कार्सने याच ओेव्हरच्या पहिल्या बॉलवर कॅमरन ग्रीनला 45 धावांवर क्लिन बोल्ड केले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे दोन्ही दिग्गज खेळाडू एकाचवेळी आऊट झाले होते.
ऑस्ट्रेलियाच्या धावा सध्या 300 पार गेल्या आहेत आणि त्यांच्या पाच विकेट पडल्या आहेत. सध्या मैदानात जोश इंग्लीश आणि अॅलेक्स कॅरी मैदानात आहेत.
