गिल आणि अभिषेक यांच्यात 9.5 ओव्हरमध्येच 105 रनची पार्टनरशीप झाली. या दोघांच्या पार्टनरशीपनंतर मात्र टीम इंडियाच्या बॅटिंगला थोडा संघर्ष करावा लागला. सूर्यकुमार यादव 0 रनवर तर संजू सॅमसन 17 बॉलमध्ये 13 रन करून आऊट झाला. पाकिस्तानकडून हारिस राऊफला 2, अबरार अहमद-फहीम अश्रफला 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताने पाकिस्तानला 20 ओव्हरमध्ये 171/5 वर रोखलं. पाकिस्तानकडून साहिबझादा फरहानने 45 बॉलमध्ये 58 रन केले. तर फहीम अश्रफने 8 बॉलमध्ये नाबाद 21 रन करून पाकिस्तानला 170 च्या पुढे नेलं. भारताकडून शिवम दुबेला 2 विकेट मिळाल्या, याशिवाय कुलदीप यादव आणि हार्दिक पांड्याला 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
advertisement
टीम इंडिया फायनलजवळ
पाकिस्तानविरुद्धच्या या विजयासोबतच टीम इंडिया आशिया कपच्या फायनलच्या जवळ पोहोचली आहे. भारताचे उरलेले सामने बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्ध आहेत. यापैकी एका सामन्यात विजय झाला तरीही भारतीय टीम फायनलमध्ये पोहोचेल.