यंदाच्या आशिया कपमध्ये भारताने एकही सामना गमावलेला नाही. ग्रुप स्टेजमध्ये भारताने युएई, पाकिस्तान आणि त्यानंतर ओमानचा पराभव केला. यानंतर सुपर-4च्या पहिल्या सामन्यातही भारताचा सहज विजय झाला, असं असलं तरी काही चुकांनी कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि कोच गौतम गंभीरचं टेन्शन वाढवलं आहे.
खराब फिल्डिंग
पाकिस्तानविरुद्धच्या सुपर-4 च्या सामन्यात टीम इंडियाने 5 कॅच सोडले. अभिषेक शर्माने 2, शुभमन गिलने एक, कुलदीप यादवने 1 कॅच सोडला. तर इनिंगच्या शेवटच्या बॉलवर शिवम दुबे बाऊंड्री लाईनच्या बराच पुढे उभा होता, त्यामुळे बॉल त्याच्या डोक्यावरून गेला. दुबे बाऊंड्री लाईनवर उभा असता, तर त्याला तो कॅच अगदी सहज पकडता आला असता. आशिया कपची फायनल जिंकण्यासाठी भारताला फिल्डिंग सुधारावी लागणार आहे.
advertisement
बुमराहचा खराब दिवस
टीम इंडियाचं ट्रम्प कार्ड असणारा बुमराह या सामन्यात अपयशी ठरला. पाकिस्तानच्या बॅटरनी पहिल्या बॉलपासूनच बुमराहवर आक्रमण केलं. बुमराहच्या 4 ओव्हरमध्ये तब्बल 45 रन आले आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही.
ओमानविरुद्धही भारतीय बॉलिंगचा संघर्ष
याआधी ओमानविरुद्धच्या सामन्यातही भारतीय बॉलिंगला संघर्ष करावा लागला. भारताने दिलेल्या 189 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना ओमानसारख्या नवख्या टीमनेही 167 रन केल्या. या सामन्यात भारतीय बॉलरना फक्त 4 विकेट घेता आल्या.
मिडल ऑर्डरला बॅटिंग नाही
आशिया कपच्या चारही सामन्यांमध्ये भारताच्या मिडल ऑर्डरला म्हणावी तशी बॅटिंग मिळालेली नाही. शिवम दुबे, अक्षर पटेल आणि हार्दिक पांड्या यांना बॅटिंगमध्ये फार बॉल खेळता आलेले नाहीत, त्यामुळे आशिया कपच्या फायनलआधी या तिघांनाही मॅच प्रॅक्टिसची गरज आहे.