टाईम्स ऑफ इंडियाने पीसीबीच्या सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. जय शाह हे आयसीसीचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे मॅचवर बहिष्कार टाकून पीसीबी आयसीसीकडून कोणत्याही निर्बंधांना सामोरं जायचा धोका पत्करू इच्छित नाही.
'पीसीबी आशिया कपमधून माघार घेईल अशी शक्यता फारच कमी आहे. जर आपण असे केले तर जय शाह यांच्या नेतृत्वाखालील आयसीसी पीसीबीवर मोठे निर्बंध लादेल आणि हे आम्हाला परवडणारे नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आम्ही स्टेडियमचे नुतनीकरण केलं आहे, त्यामुळे आमची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही', असं पीसीबीच्या सूत्रांनी सांगितलं आहे. पाकिस्तानने खेळण्यावर बहिष्कार टाकला तर आयसीसी अधिकृतपणे पीसीबीवर निर्बंध लादू शकते का? याचा नेमका काय परिणाम होऊ शकतो? हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
advertisement
नेमका वाद काय?
रविवारी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा 7 विकेटने विजय झाला. या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन केलं नाही. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा टॉससाठी आले, तेव्हा मॅच रेफरी ऍन्डी पायक्रॉफ्ट यांनी हस्तांदोलन होणार नसल्याचं जाहीर केलं. सामना संपल्यानंतरही भारतीय टीमने हस्तांदोलन केलं नाही, त्यामुळे अपमान झाल्याची तक्रार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केला आहे.
'आयसीसीने नियुक्त केलेल्या मॅच रेफरींनी खेळ भावना आणि कायद्यांचे स्पष्टपणे उल्लंघन केलं आहे. मॅच रेफरींचं हे वर्तन चिंताजनक आहे. मॅच रेफरी त्यांची जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरले. मॅच रेफरीचं काम दोन्ही टीममधला आदर कसा वाढेल? हे पाहणं आहे', असं पत्र पीसीबीने आयसीसीला लिहिलं. आयसीसीने मात्र पायक्रॉफ्ट यांना बाजूला करण्याची पीसीबीची मागणी फेटाळून लावल्याचं वृत्त आहे.