खरं तर सुपर 4 च्या सामन्यांना उद्या 20 सप्टेंबरपासून सूरूवात होणार आहे. त्यामुळे या संघाना अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी प्रत्येकी 3 सामने खेळावे लागणार आहेत. हे सामने पाहता पाकिस्तानही हार होणार हे स्पष्ट दिसते आहे. यामागचे कारण काय आहे? हे जाणून घेऊयात.
सुपर 4 मध्ये टीम इंडिया तीन सामने खेळणार, कधी,केव्हा,कुणासोबत लढणार? वाचा एका क्लिकवर
advertisement
सूपर 4 मध्ये पोहोचलेल्या पाकिस्तानचा पहिलाच सामना हा कट्टर प्रतिस्पर्धी टीम इंडियाशी होणार आहे. हा सामना 21 सप्टेंबरला रंगणार आहे.याआधी देखील हे संघ साखळी फेरीत आमने सामने आले होते. त्यावेळी टीम इंडियाने पाकिस्तानचा सहज पराभव केला होता. त्यामुळे हा सामना लक्षात घेता पाकिस्तानची हार स्पष्ट दिसतेय.
यानंतर पाकिस्तानचा दुसरा सामना हा बी ग्रुपमधील टॉपचा संघ असलेल्या श्रीलंकेशी होणार आहे.श्रीलंका सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे.त्यामुळे श्रीलंकेची आशिया कपमधील कामगिरी पाहता पाकिस्तानला या सामन्यात ही जिंकणे अवघड जाणार आहे. जर पाकिस्तान भारत आणि श्रीलंकेविरूद्ध हरली तर त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्ठात येणार आहे.
पण जर समजा पाकिस्तान श्रीलंकेविरूद्ध जिंकली.त्यानंतर पाकिस्तानचा तिसरा सामना हा बांग्लादेशसोबत असणार आहे.या बांग्लादेशला देखील पाकिस्ताने पराभवाचं पाणी पाजलं तर पाकिस्तान नक्कीच फायनलमध्ये पोहोचण्यासाठी पात्र ठरण्याची शक्यता आहे.त्यामुळे आता पाकिस्तान खरंच फायनलमध्ये पोहोचते की दोनच सामन्यात त्यांचं आव्हान संपुष्ठात येते? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
अंतिम सामना
सुपर 4 मध्ये जे दोन संघ पॉईट्स टेबलला टॉपला राहतील त्या संघांमध्ये अंतिम सामना पार पडणार आहे. सध्या तरी अंतिम सामन्यात पोहोचण्यास श्रीलंका आणि टीम इंडिया दावेदार मानली जात आहे.
सुपर-4 आणि अंतिम सामना
20 सप्टेंबर – श्रीलंका(बी1) विरुद्ध बांग्लादेश (बी2)
21 सप्टेंबर – भारत (ए1) विरुद्ध पाकिस्तान (ए2)
23 सप्टेंबर – पाकिस्तान (ए2) विरुद्ध श्रीलंका(बी1)
24 सप्टेंबर – भारत (ए1) विरुद्ध बांग्लादेश (बी2)
25 सप्टेंबर – पाकिस्तान (ए2) विरुद्ध बांग्लादेश (बी2)
26 सप्टेंबर – भारत (ए1) विरुद्ध श्रीलंका(बी1)
28 सप्टेंबर – सुपर 4 मधील टॉपचे दोन संघ अंतिम सामन्यात भिडणार आहेत.