Asia Cup 2025 : सुपर 4 चं चित्र क्लिअर, भारत पाकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलंका...कोणता संघ कुणाशी भिडणार, वाचा टाईमटेबल
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
आशिया कपमध्ये आज श्रीलंकने अफगाणिस्तानवर 6 विकेटस राखून विजय मिळवला आहे.त्यामुळे अफगाणिस्तान स्पर्धेतून बाहेर झाली आहे. तर या विजयासह श्रीलंका सुपर 4 मध्ये पोहोचणारी तिसरी टीम ठरली आहे.
Asia Cup 2025 Super 4 scenario : आशिया कपमध्ये आज श्रीलंकने अफगाणिस्तानवर 6 विकेटस राखून विजय मिळवला आहे.त्यामुळे अफगाणिस्तान स्पर्धेतून बाहेर झाली आहे. तर या विजयासह श्रीलंका सुपर 4 मध्ये पोहोचणारी तिसरी टीम ठरली आहे. तर बांग्लादेश चौथ्या क्रमांकावर राहिली आहे.अशा प्रकारे आजच्या सामन्यानंतर सुपर 4 चं चित्र स्पष्ट झाली आहे. आता हे चार संघ एकमेकांशी कधी आणि कसे लढणार आहेत. याचे वेळापत्रक पाहूयात.
भारत,पकिस्तान,श्रींलका आणि बांग्लादेश असे सुपर 4 चे संघ ठरले आहेत.हे चार संघ आता कुणाशी भिडणार आहेत.हे जाणून घेऊयात.
टीम इंडिया
टीम इंडियाला सुपर 4 मध्ये तीन सामने खेळावे लागणार आहे. यातला पहिला सामना पाकिस्तान विरूद्ध 21 सप्टेंबरला असणार आहे.त्यानंतर दुसरा सामना हा बांग्लादेश विरूद्ध 24 सप्टेंबरला असणार आहे. आणि तिसरा सामना हा 26 सप्टेंबरला श्रीलंकेविरूद्ध असणार आहे.
advertisement
पाकिस्तान
पाकिस्तानला सुपर 4 मध्ये तीन सामने खेळावे लागणार आहे. यातला पहिला सामना भारता विरूद्ध 21 सप्टेंबरला असणार आहे.त्यानंतर दुसरा सामना हा 23 सप्टेंबरला श्रीलंकेविरूद्ध खेळावा लागणार आहे.आणि तिसरा सामन हा 25 सप्टेंबरला बांग्लादेश विरूद्ध खेळावा लागेल.
श्रीलंका
श्रीलंकेला सुपर 4 मध्ये तीन सामने खेळावे लागणार आहे.श्रीलंकेचा पहिला सामना हा 20 सप्टेंबरला बांग्लादेशविरूद्ध असणार आहे.तर दुसरा सामना 23 सप्टेंबरला पाकिस्तान विरूद्ध असणार आहे.आणि तिसरा सामना हा भारता विरूद्ध 26 सप्टेंबरला असणार आहे.
advertisement
बांग्लादेश
बांग्लादेशला सुपर 4 मध्ये तीन सामने खेळावे लागणार आहे.बांग्लादेशता पहिला सामना 20 सप्टेंबरला श्रीलंकेविरूद्ध होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना 24 सप्टेंबरला भारताविरूद्ध होणार. तर शेवटचा सामना हा 25 सप्टेंबरला पाकिस्तान विरूद्ध खेळावा लागणार आहे.
अंतिम सामना
या सामन्यातू जे दोन संघ टॉपला राहतील त्या संघामध्ये अंतिम सामना पार पडणार आहे.
सुपर-4 आणि अंतिम सामना
20 सप्टेंबर – श्रीलंका(बी1) विरुद्ध बांग्लादेश (बी2)
advertisement
21 सप्टेंबर – भारत (ए1) विरुद्ध पाकिस्तान (ए2)
23 सप्टेंबर – पाकिस्तान (ए2) विरुद्ध श्रीलंका(बी1)
24 सप्टेंबर – भारत (ए1) विरुद्ध बांग्लादेश (बी2)
25 सप्टेंबर – पाकिस्तान (ए2) विरुद्ध बांग्लादेश (बी2)
26 सप्टेंबर – भारत (ए1) विरुद्ध श्रीलंका(बी1)
28 सप्टेंबर – सुपर 4 मधील टॉपचे दोन संघ अंतिम सामन्यात भिडणार आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 18, 2025 11:48 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asia Cup 2025 : सुपर 4 चं चित्र क्लिअर, भारत पाकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलंका...कोणता संघ कुणाशी भिडणार, वाचा टाईमटेबल