बुमराहला विश्रांती?
भारतीय टीम व्यवस्थापन शुक्रवारी ओमानविरुद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग 11 मध्ये जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्याची शक्यता आहे. टीम इंडियाचा ग्रुप स्टेजमधला हा शेवटचा सामना आहे. यानंतर भारतीय टीम 21, 24 आणि 26 सप्टेंबर रोजी सुपर-4 मध्ये आपले सामने खेळेल, तर 28 सप्टेंबरला आशिया कपची फायनल होणार आहे. भारतीय टीम आशिया कपच्या फायनलला पोहोचली तर त्यांना 7 दिवसांमध्ये 4 मॅच खेळाव्या लागणार आहेत.
advertisement
बुमराहचं वर्कलोड मॅनेजमेंट
जसप्रीत बुमराहला फिट आणि ताजेतवाने ठेवण्यासाठी ओमानविरुद्धच्या सामन्यात विश्रांती दिली जाऊ शकते, कारण स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात टीम इंडियाला बुमराहची जास्त गरज पडणार आहे. बुमराहला विश्रांती दिली तर त्याच्याऐवजी अर्शदीप सिंग किंवा हर्षीत राणा यांच्यापैकी एक जण मैदानात उतरेल. बुमराहच्या गैरहजेरीमध्ये अर्शदीपला संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे, कारण अर्शदीपकडे अनुभव आहे, तसंच तो टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 विकेट पूर्ण करण्याच्या जवळ आहे.
भारताचे युएई आणि पाकिस्तानविरुद्धचे पहिले दोन सामने एकतर्फी होते आणि अशा परिस्थितीत, ओमानविरुद्ध निर्भयपणे फलंदाजी करून, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यासारख्या कठीण प्रतिस्पर्ध्यांचा सामना करण्यापूर्वी भारतीय टीम आपला खेळ आणखी सुधारण्याचा प्रयत्न करेल.