यानंतर मॅचच्या पाचव्या ओव्हरमध्ये चौथ्या बॉलवर कुलदीप यादवने सॅम अयुबला जीवनदान दिलं. वरुण चक्रवर्तीच्या बॉलिंगवर कुलदीप यादवनेही हातातला कॅच सोडला. सॅम अयुबनंतर भारताने साहिबजादा फरहान याला आणखी एक लाईफलाईन दिली. पुन्हा एकदा वरुण चक्रवर्तीच्याच बॉलिंगवर अभिषेक शर्माने बाऊंड्री लाईनवर साहिबजादा फरहानचा कॅच सोडला आणि बॉल बाऊंड्री लाईनबाहेर गेला, त्यामुळे फरहानला जीवनदान मिळालं.
advertisement
साहिबजादा फरहान याने त्याला मिळालेल्या या दोन लाईफलाईनचा चांगलाच फायदा घेतला. 34 बॉलमध्ये त्याने अर्धशतक पूर्ण केलं. साहिबजादाच्या या खेळीमुळे पाकिस्तानने 10 ओव्हरमध्ये 91/1 पर्यंत मजल मारली. आशिया कप 2025 मधला हा 10 ओव्हरमधला हा सर्वोत्तम स्कोअर आहे.
पाकिस्तानने पॉवर प्लेमध्ये 1 विकेट गमावून 55 रन केले. भारताविरुद्धचा पाकिस्तानचा पॉवर प्ले मधला हा सर्वोत्तम स्कोअर आहे. याआधी 2012 साली अहमदाबादमध्ये पाकिस्तानने भारताविरुद्ध पॉवरप्लेमध्ये 54/0 एवढा स्कोअर केला होता.
बुमराहकडून निराशा
टीम इंडियाचं ट्रम्प कार्ड असलेला जसप्रीत बुमराहदेखील या सामन्याच्या पहिल्या 3 ओव्हरमध्ये अपयशी ठरला. पहिल्या 3 ओव्हरमध्ये बुमराहने तब्बल 34 रन दिल्या. पॉवर प्लेमध्ये बुमराहने दिलेला हा सर्वाधिक स्कोअर आहे. याआधी 2016 साली बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पॉवरप्लेमध्ये 31 रन दिले होते.
साहिबजादा फरहानने बुमराहविरुद्ध 24 बॉलमध्ये 137.50 च्या स्ट्राईक रेटने 33 रन केले आहेत, ज्यात 4 फोर आणि 2 सिक्सचा समावेश आहे. बुमराहविरुद्ध फक्त 2 खेळाडूंनीच साहिबजादापेक्षा जास्त रन केले आहेत.