टीम इंडियाविरुद्धचा पराभव आणि हस्तांदोलनाचा वाद पाकिस्तानच्या जिव्हारी लागला आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद युसूफ याने सूर्यकुमार यादव याच्याबद्दल बोलताना गरळ ओकली आहे. लाईव्ह टीव्हीमध्ये मोहम्मद युसूफने सूर्यकुमार यादवबद्दल अपशब्द वापरले आहेत.
मोहम्मद युसूफने लाईव्ह टीव्हीमध्ये सूर्यकुमार यादवबद्दल बोलताना पातळी सोडली. मोहम्मद युसूफकडून सूर्यकुमार यादवचा उल्लेख वारंवार 'सुअर' म्हणून केला गेला. अँकरने मोहम्मद युसूफला भारतीय कर्णधाराचं योग्य नाव सांगण्याचा प्रयत्न केला, पण युसूफने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि पुन्हा तेच शब्द वापरले.
advertisement
भारताने मैदानातील अंपायर आणि मॅच रेफरींना विकत घेऊन पाकिस्तानी टीमला छळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही युसूफने केलं आहे. 'ये सुअर कुमार जो है... सुअर कुमार यादव. भारत ज्या पद्धतीने जिंकण्याचा प्रयत्न करत आहे, त्याची लाज वाटली पाहिजे. अंपायरना बाजूने घेऊन मॅच रेफरींचा वापर करून त्रास दिला जात आहे. त्यांनी अंपायरचं बोट मोदींकडे दिलं असेल, जेव्हा आम्ही अपील करतो, तेव्हा अंपायरचा हात वरती जात नाही', असे बेछुट आरोप युसूफने केलं.
पाकिस्तानची रेफरीविरोधात तक्रार
दरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मॅच रेफरी ऍन्डी पायक्रॉफ्ट यांची आयसीसीकडे तक्रार केली आहे. ऍन्डी पायक्रॉफ्ट यांनी टॉसवेळी दोन्ही कर्णधारांना हस्तांदोलन करण्यापासून रोखलं, असा आरोप पीसीबीने केला आहे. मॅच रेफरीचं वर्तन खेळ भावनेच्या विरोधात होतं, तसंच त्यांनी नियमांचंही उल्लंघन केल्याचा आरोप पीसीबीने केला. पायक्रॉफ्ट यांची हकालपट्टी करण्याची मागणीही पीसीबीने केली, पण आयसीसीने त्यांची ही मागणी फेटाळून लावली.