TRENDING:

Asia Cup Rising Star : वैभव फेल, पण दुबेचा धमाका... टीम इंडिया आशिया कपच्या सेमी फायनलमध्ये, कुणाशी भिडणार?

Last Updated:

आशिया कप रायजिंग स्टारमध्ये इंडिया ए ने ओमानचा 6 विकेटने धुव्वा उडवला आहे. या विजयासोबतच इंडिया ए स्पर्धेच्या सेमी फायनलमध्येही पोहोचली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दोहा : आशिया कप रायजिंग स्टारमध्ये इंडिया ए ने ओमानचा 6 विकेटने धुव्वा उडवला आहे. या विजयासोबतच इंडिया ए स्पर्धेच्या सेमी फायनलमध्येही पोहोचली आहे. ओमानने दिलेल्या 136 रनच्या आव्हानाचा पाठलाग भारताने 17.5 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून पार केला. भारताकडून हर्ष दुबेने 44 बॉलमध्ये नाबाद 53 रन केले, ज्यात 7 फोर आणि एका सिक्सचा समावेश होता. तर नमन धीरने 19 बॉल 30 आणि नेहल वढेराने 24 बॉलमध्ये 23 रनची खेळी केली.
वैभव फेल, पण दुबेचा धमाका... टीम इंडिया आशिया कपच्या सेमी फायनलमध्ये, कुणाशी भिडणार?
वैभव फेल, पण दुबेचा धमाका... टीम इंडिया आशिया कपच्या सेमी फायनलमध्ये, कुणाशी भिडणार?
advertisement

ओमानच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंडिया ए ची सुरूवात खराब झाली. प्रियांश आर्या 6 बॉलमध्ये 10 रन आणि वैभव सूर्यवंशी 13 बॉलमध्ये 12 रन करून आऊट झाला, पण त्यानंतर हर्ष दुबे आणि नमन धीरने ओमानच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. ओमानकडून जय ओडेड्रा, शफीक जान, समय श्रीवास्तव आणि आर्यन बिष्ट यांना एक-एक विकेट घेण्यात यश आलं.

advertisement

ओमानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार जितेश शर्माने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, त्यानंतर भारताने ओमानला 20 ओव्हरमध्ये 135/7 वर रोखलं. वसीम अलीने 45 बॉलमध्ये नाबाद 54 रन केले. तर हमाद मिर्झाने 16 बॉलमध्ये 32 रनची खेळी केली. भारताकडून सुयश शर्मा आणि गुरजापनीत सिंग यांना 2-2 विकेट मिळाल्या. तर विजयकुमार वैश्यक, हर्ष दुबे आणि नमन धीर यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

advertisement

इंडिया सेमी फायनलमध्ये

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याचे दर गडगडले, सोयाबीनच्या दरात पुन्हा वाढ, कांद्याची आज काय स्थिती? Video
सर्व पहा

आशिया कप रायजिंग स्टारच्या स्पर्धेत इंडिया ए चा युएईविरुद्ध विजय झाला तर पाकिस्तानविरुद्ध भारताला पराभवाचा धक्का बसला, त्यामुळे सेमी फायनलला पोहोचण्यासाठी भारताला ओमानविरुद्ध विजय गरजेचा होता. ओमानला हरवून इंडिया ए ने सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताची सेमी फायनल शुक्रवार 21 नोव्हेंबरला खेळवली जाईल. सेमी फायनलमध्ये भारताचा सामना बांगलादेशविरुद्ध होण्याची शक्यता आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asia Cup Rising Star : वैभव फेल, पण दुबेचा धमाका... टीम इंडिया आशिया कपच्या सेमी फायनलमध्ये, कुणाशी भिडणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल