इनिंगच्या 19व्या ओव्हरला एसएम मेहरूबने नमन धीरला तब्बल 28 रन ठोकल्या, ज्यात 4 सिक्स आणि एका फोरचा समावेश होता. पंजाबकडून स्थानिक क्रिकेट खेळणारा नमन धीर हा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. आयपीएलच्या मागच्या मोसमात नमन धीरने मुंबईसाठी फिनिशरची महत्त्वाची भूमिका बजावली होती.
बांगलादेशकडून एसएम मेहरूबने 18 बॉलमध्ये 266.67 च्या स्ट्राईक रेटने 48 रन केल्या, यात 6 सिक्स आणि एका फोरचा समावेश होता. मेहरूबशिवाय ओपनर हबिबुर रहमान सोहन याने 46 बॉलमध्ये 65 रनची खेळी केली, यात त्याने 3 फोर आणि 5 सिक्स मारल्या. भारताकडून गुरजापनीत सिंग याने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या, याशिवाय हर्ष दुबे, सुयश शर्मा, रमणदीप सिंग आणि नमन धीर यांना एक-एक विकेट मिळाली.
advertisement
भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या या सामन्यात ज्या टीमचा विजय होईल ती आशिया कप रायजिंग स्टारच्या फायनलमध्ये पोहोचेल, तर पराभूत टीमचं आव्हान संपुष्टात येईल. स्पर्धेची दुसरी सेमी फायनल आजच रात्री 8 वाजता पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात होईल, या सामन्यातली विजयी टीम आशिया कपच्या फायनलमध्ये प्रवेश करेल.
