Australia vs England 1st Test : बहुचर्चित ॲशेस मालिकेला आजपासून सूरूवात झाली आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्याच्या पहिल्याच दिवशी जबरदस्त सामना पाहायला मिळाला.कारण पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला ऑलआऊट केले, त्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी दिवसअखेर ऑस्ट्रेलियाला ऑलआऊटच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं होतं. त्यामुळे पहिल्या दिवशी सामन्यात मोठा ड्रामा पाहायला मिळाला.पण या दरम्यान ॲशेस कसोटीच्या इतिहासात 100 वर्षात पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे. याआधी अशी घटना कधीच घडली नव्हती.त्यामुळे नेमकं काय घडलं आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
खरं तर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या टेस्ट सामन्याच्या पहिल्याच दिवशी 71.5 ओव्हरचा खेळ झाला होता. या दरम्यान इंग्लंडने 172 आणि ऑस्ट्रेलियाने 9 विकेट गमावून 123 धावा केल्या होत्या.त्यामुळे ॲशेस कसोटी मालिकेच्या पहिल्याच दिवशी दोन्ही संघाच्या मिळून एकूण 295 धावा झाल्या होत्या तर एकाच दिवशी तब्बल 19 विकेट पडले होते. त्यामुळे ॲशेस क्रिकेटच्या 100 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे. याआधी असं कधीच घडलं नव्हतं.
या आधी 2001 साली ब्रिजमध्ये हे प्रतिस्पर्धी ॲशेस मालिकेत आमने सामने आलो होते.त्यावेळी सामन्याच्या पहिल्या दिवशी 17 विकेट (इंग्लंड 10 आणि ऑस्ट्रेलिया 7) पडले होते. तर 2005 साली देखील लॉर्डसच्या मैदानावरील सामन्यात पहिल्या दिवशी 17 विकेट (इंग्लंड 7 आणि ऑस्ट्रेलिया 10) पडले होते. त्यामुळे अॅशेसमध्ये पहिल्यांदाच 100 वर्षांच्या इतिहासात पहिल्या दिवशी 19 विकेट पडले आहेत.
पर्थच्या मैदानावर अनोखा रेकॉर्ड
पर्थच्या मैदानावर सामन्याच्या पहिल्याच दिवशी 19 विकेट पडल्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी 2024 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दरम्यान पहिल्याच दिवशी 17 विकेट पडले होते.
कसा रंगला पहिल्या दिवसाचा खेळ
खरं तर आपल्या भेदक गोलंदाजीने इंग्लंडला अवघ्या 172 धावांवर ऑल आऊट केल्यानंतर ऑस्ट्रेलिया मैदानात दबदबा करेल असे वाटत होते. पण ज्याप्रमाणे ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांचे हाल केले.त्याचप्रमाणे इंग्लंडच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचे हाल केले आहेत. ऑस्ट्रेलिया पहिल्या दिवसअखेर 9 विकेट गमावून 123 धावांवर खेळते आहेत.ऑस्ट्रेलिया अजून इंग्लंडपासून 49 धावा दूर आहे. ऑस्ट्रेलियाकडून अॅलेक्स कॅरीने सर्वाधिक 26 धावा केल्या आहेत. या व्यतिक्त कुणालाही 25 चा आकडा गाठता आला नाही आहे. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने 5 तर जोफ्रा आर्चर आणि ब्रायडन कार्सने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या आहेत.
प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडची सूरूवात खराब झाली होती. इंग्लंडकडून हॅरी ब्रुकने सर्वाधिक 52 धावांची अर्धशतकीत खेळी केली होती.तर ओली पोपने 46 धावा केल्या होत्या आणि जेमी स्मिथने 33 धावा केल्या होत्या.या व्यतिरीक्त कुणालाही मोठ्या धावा करता आल्या नाही. त्यामुळे इंग्लंडचा पहिला डाव 172 वर ऑल आऊट झाला होता.ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक 7 विकेट तर ब्रेंडन डोगटने 2 आणि ग्रीनने एक विकेट घेतली होती.
