TRENDING:

AUS W vs ENG W : आधी शतक कुणाच! 2 वर्षापूर्वी जे विराटसोबत घडलं, तेच सुथरलँडने अनुभवलं, मैदानात भयंकर ड्रामा

Last Updated:

ॲनाबेल सुथरलँडच शतकं होऊ शकलं असतं पण जे विराट कोहली काही वर्षापूर्वीच घडलं होतं.तसंच काहीसं आता ॲनाबेल सुथरलँड सोबत सामन्यात घडलं होते.त्यामुळे मैदानात भंयकर ड्रामा झाला होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
AUS W vs ENG W : आयसीसी वुमेन्स वर्ल्ड कपच्या आजच्या सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाने अवघ्या 40 ओव्हरमध्येच 248 धावांच आव्हान पुर्ण करत 6 विकेट राखून हा सामना जिंकला आहे. या विजयात ॲश्ली गार्डनर आणि ॲनाबेल सुथरलँड या दोन्ही खेळाडूंनी मोलाची भूमिका बजावली. कारण या सामन्यात ॲश्ली गार्डनरने 104 धावांची नाबाद शतकीय खेळी केली तर ॲनाबेल सुथरलँडने 98 धावांची नाबाद खेळी केली. ॲनाबेल सुथरलँडच शतकं होऊ शकलं असतं पण जे विराट कोहली काही वर्षापूर्वीच घडलं होतं.तसंच काहीसं आता ॲनाबेल सुथरलँड सोबत सामन्यात घडलं होते.त्यामुळे मैदानात भंयकर ड्रामा झाला होता.
aus w beat eng w by 6 wicket
aus w beat eng w by 6 wicket
advertisement

विराट कोहलीसोबत 2023 च्या वर्ल्डकप स्पर्धे दरम्यान जी घटना घडली होती, तशीच घटना आता ऑस्ट्रेलियाच्या ॲनाबेल सुथरलँड सोबत घडली आहे.त्याचं झालं असं की इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 244 धावा ठोकल्या होत्या.त्यामुळे ऑस्ट्रेलियासमोर 245 धावांचे आव्हान होते. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचे 68 धावांवर 4 विकेट पडले होते.त्यानंतर ॲश्ली गार्डनर आणि ॲनाबेल सुथरलँडने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरत 40. 3 ओव्हरमध्ये हे लक्ष्य गाठत हा सामना 6 विकटने जिंकला होता

advertisement

पण या लक्ष्याचा पाठलाग करताना मैदानात भयंकर ड्रामा झाला होता.त्याचं झालं असं की ॲश्ली गार्डनर आणि ॲनाबेल सुथरलँड या दोघीही आपल्या शतकाच्या उंबरठ्यावर होत्या. 39 व्या ओव्हरमध्ये ॲनाबेल 92 वर होती, तर गार्डनर 96 धावांवर होती. या दरम्यान दोघींना शतक करण्याची संधी होती, पण मध्येच एक घटना घडली आणि सुथरलँड शतक हुकलं.

advertisement

ॲनाबेल 92 वर असताना तिने पुढे पहिल्या बॉलवर 2 आणि दुसऱ्या बॉलवर 2 धावा काढल्या, अशाप्रकारे ती 95वर पोहोचली.त्यानंतर गार्डरने स्ट्राईकवर येऊन चौकार मारत आपलं शतकं ठोकलं. त्यानंतर गार्डरने ॲनाबेलाचे शतक पुर्ण होण्यासाठी तीन बॉल डॉट केले. जेणेकरून ॲनाबेलाला स्ट्राईक मिळेल आणि शतक ठोकू शकेल. पण पुढे याउलट घडलं.

खरं तर ऑस्ट्रेलिया 241 पर्यंत पोहोचली होती. आता ऑस्ट्रेलियाला जिंकायला बरोबर 4 धावा हवा होत्या आणि ॲनाबेलेलाही शतकासाठी 5 धावा हव्या होत्या.त्यामुळे ती आरामात आपलं शतकं ठोकू शकली असती. पण तिने पहिल्या बॉलवर 2 धावा काढल्या. आता पुढे दुसऱ्या बॉलवर 1 धावा काढली.आता जिंकण्यासाठी फक्त एक धावाची गरज होती आणि गार्डनरला शतकासाठी 2 धावाची गरज होती.यावेळी गार्डनर एक धावा काढण्याच्या चक्करमध्ये चौकार गेला आणि सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला पण 98 धावांपर्यंत पोहोचूनही सुथरलँडच शतकं हुकलं.

advertisement

विराटच्या खेळीशी खास कनेक्शन

विराटसोबत ही असाच काहीसा प्रसंग घडला होता. पण त्याने या सामन्यात शतक ठोकून दाखवलं होत. बांग्लादेशने भारताला 256 धावांच आव्हान दिलं होतं. हे आव्हान भारताने 7 विकेट राखून पूर्ण करत हा सामना जिंकला होता. या सामन्यात 256 धावांचा पाठलाग करताना विराट कोहली शेवटच्या क्षणी शतकाच्या उंबरठ्यावर होता.त्यावेळेस भारताला विजयासाठी 5 धावा आणि कोहलीला शतकासाठी 6 धावांची गरज होती. या दरम्यान पहिल्यांदा 2 आणि नंतर 1 धाव घेतली.अशाप्रकारे कोहली 97 वर पोहोचला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
भाऊबीजची शॉपिंग करताय? 350 रुपयांत मिळतायत 3-पीस कॉटन ड्रेस, हे आहे लोकेशन
सर्व पहा

आता भारताला विजयासाठी 2 आणि कोहलीला शतकासाठी 3 धावा हव्या होत्या. बांग्लादेश गोलंदाजाने वाईड बॉल टाकला पण सुदैवाने अंपायनरे तो दिला नाही.त्यानंतर दुसऱा बॉल डॉ झाला.त्यानंतर तिसऱ्या बॉलवर कोहलीने षटकार मारून सामनाही जिंकला आणि आपलं शतकही ठोकलं होत. त्यामुळे जो प्रसंग सुथलँडसोबत आज घडला होता, तसाच प्रसंग विराट कोहलीसोबत दोन वर्षापुर्वी घडला होता.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
AUS W vs ENG W : आधी शतक कुणाच! 2 वर्षापूर्वी जे विराटसोबत घडलं, तेच सुथरलँडने अनुभवलं, मैदानात भयंकर ड्रामा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल