बेन स्टोक्स टॉस जिंकल्यावर काय म्हणाला?
आम्ही टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करू. अशा ठिकाणी जिथं जास्त क्रिकेट होत नाही. आम्ही बोर्डवर काही धावा काढण्याचा प्रयत्न करू. आम्ही चार वेगवान गोलंदाजांसह जात आहोत आणि अर्थातच मी वेळोवेळी बॉलिंग करेल. वुडीज दुखापतीमुळे थोडा वेळ बाहेर होता पण आता तो त्यापासून मुक्त झाला आहे. त्याने बराच काळ अविश्वसनीय मेहनत घेतली आहे, असं बेन स्टोक्स म्हणाला आहे.
advertisement
ऑस्ट्रेलियाकडे अॅशेसची ट्रॉफी
दरम्यान, सध्या ऑस्ट्रेलियाकडे अॅशेसची ट्रॉफी आहे. 2021 च्या हंगामात संघाने पाचपैकी चार सामने जिंकले, तर एक सामना अनिर्णित राहिला. त्यानंतर 2023 ची मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली होती.
पर्थ कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन: स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), उस्मान ख्वाजा, जेक वेदरल्ड, मार्नस लाबुशेन, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स केरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, ब्रेंडन डॉगेट, स्कॉट बोलँड.
पर्थ कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन: बेन डकेट, झॅक क्रॉली, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकीपर), गस अॅटकिन्सन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, मार्क वूड.
