अॅडम झम्पा नावाच्या या स्कॅमरने अश्विनकडे अभिषेक शर्मा, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, जितेश शर्मा, रिंकू सिंग आणि शिवम दुबे या खेळाडूंचे फोन नंबर मागितले. मेसेज मिळताच अश्विनला लगेच लक्षात आले की तो अॅडम झम्पा नाही तर एक स्कॅमर आहे. परिणामी, अश्विनने स्कॅमरला धडा शिकवण्याचं ठरवलं.
अश्विनने उडवली स्कॅमरची खिल्ली
अश्विनने आपण स्कॅमर असल्याचं ओखळलं आहे, याची कल्पना त्याला नव्हती. तुला एवढ्याच लोकांचे नंबर हवे आहेत का? आणखी कुणाचे नंबर हवे आहे का? असं अश्विनने विचारलं. तुझ्याकडे धोनीचा नंबर आहे का, का तो पण देऊ? अशी गुगली अश्विनने टाकली, तेव्हा स्कॅमरने आपल्याकडे धोनीचा नंबर असल्याचं सांगितलं. यानंतर अश्विनने मला धोनीचा नंबर दे, कारण माझ्याकडे त्याचा नंबर नाही, असं सांगितलं.
याआधीही अश्विनची फसवणूक
अश्विन स्कॅमर्सच्या रडारवर यायची ही पहिलीच वेळ नाही. याआधी एका स्कॅमरने आपण न्यूझीलंडचा डेवॉन कॉनवे असल्याचं सांगून अश्विनची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. 'आयपीएल संपल्यानंतर एका व्यक्तीने मला डेवॉन कॉनवे असल्याचं सांगितलं आणि माझ्याकडे विराट कोहलीचा नंबर मागितला', असं अश्विनने त्याच्या युट्युब चॅनलवर सांगितलं होतं.