11 व्या ओव्हरमध्ये काय घडलं?
हा प्रसंग 11 व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर घडला. मिचेल स्टार्क बॉलिंग करत असताना, अक्षरने पुढे येऊन ड्राइव्ह मारला. बॉल कव्हर्सच्या दिशेने गेला आणि अक्षर तसेच श्रेयस अय्यर यांनी दोन रन घेतले. रिप्लेमध्ये स्पष्ट झाले की, रन घेताना अक्षरची बॅट लाइन पार करू शकली नाही, ज्यामुळे पंचांनी टीम इंडियाच्या स्कोरमधून एक रन कमी केला आणि या बॉलवर फक्त दोन रन जमा झाले.
advertisement
किती ओव्हरची होणार मॅच?
यापूर्वी, पॉवरप्लेमध्ये टीम इंडियाने 3 विकेट गमावत केवळ 27 रन केले होते. रोहित शर्मा 8 रनवर, तर विराट कोहली झिरो रनवर आउट झाला. वनडेचा नवा कॅप्टन शुभमन गिल देखील 10 रन करून परतला. दरम्यान, ही मॅच सध्या रेनमुळे थांबली आहे. पावसामुळे मॅच आधीच 49 ओव्हरची करण्यात आली होती आणि आता गेल्या सुमारे एका तासापासून गेम थांबल्यामुळे ओव्हरमध्ये आणखी कपात होण्याची शक्यता आहे.
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.
ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन - ट्रॅव्हिस हेड, मिशेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश फिलिप (विकेटकीपर), मॅट रेनशॉ, कूपर कॉनोली, मिशेल ओवेन, मिशेल स्टार्क, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन, जोश हेझलवुड.