सुपर ओव्हरचा थरार
बांगलादेशने दिलेल्या 214 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला 9 विकेट गमावून 213 रनच करता आल्या, त्यामुळे सामना टाय झाला आणि मग सुपर ओव्हर सुरू झाली. त्यानंतर बॅटिंगला आलेल्या वेस्ट इंडिजने 6 बॉलमध्ये 10 रन केले, ज्यामुळे बांगलादेशला विजयासाठी 11 रनचं आव्हान मिळालं. हे आव्हान रोखण्यासाठी वेस्ट इंडिजने अकील हुसैन या डावखुऱ्या स्पिनरला बॉलिंग दिली आणि त्याने 6 बॉलमध्ये 9 रनच दिले, त्यामुळे वेस्ट इंडिजने हा सामना 1 रनने जिंकला.
advertisement
बांगलादेशच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला 50 ओव्हरमध्ये 213/9 एवढा स्कोअर करता आला. कर्णधार शाय होपने 53 रनची खेळी केली, तर जस्टीन ग्रीव्हसने 26 आणि अलिक अथान्झने 28 रन केले. बांगलादेशकडून रिशाद हुसैनला सर्वाधिक 3 विकेट मिळाल्या. तर तनवीर इस्लाम, नसुम अहमदला 2-2 आणि सैफ हसनला 1 विकेट घेण्यात यश आलं.
या सामन्यात बांगलादेशने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर त्यांनी 50 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 213 रन केले. सौम्य सरकारने सर्वाधिक 45 रनची खेळी केली, तर नवव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या रिशाद हुसैनने 14 बॉलमध्ये 39 रन केले, ज्यात 3 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता.
50 ओव्हर स्पिन बॉलिंग
या सामन्यात वेस्ट इंडिजने सर्व 50 ओव्हर स्पिन बॉलिंगच केली. गुडाकेश मोतीने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर अकील हुसैन आणि अलिक अथान्झला 2-2 विकेट मिळाल्या. रोस्टन चेस आणि खेरी पेर या दोन्ही स्पिनरना एकही विकेट मिळाली नसली तरी त्यांनी फार रनही दिल्या नाहीत. बांगलादेश आणि वेस्ट इंडिज यांच्यातली 3 वनडे मॅचची सीरिज 1-1 ने बरोबरीत आली आहे. आता सीरिजचा शेवटचा सामना 23 ऑक्टोबरला होणार आहे.