वेस्ट इंडिजने सुपर ओव्हरमध्ये डावखुरा स्पिनर अकील हुसैनच्या हातात बॉल दिला, पण सुपर ओव्हरमध्ये हुसैनने 6 नाही तर 8 बॉल टाकले. अकील हुसैनने सुपर ओव्हरचा पहिलाच बॉल वाईड टाकला, यानंतर पुढचा बॉल त्याने नो बॉल टाकला. 0 बॉलवर बांगलादेशच्या 4 रन झाल्या होत्या, त्यामुळे त्यांना विजयासाठी 6 बॉलमध्ये 7 रनची गरज होती, यानंतर मात्र अकील हुसैनने एकही चूक केली नाही आणि पुढच्या 6 बॉलमध्ये फक्त 5 रन दिल्या, त्यामुळे वेस्ट इंडिजने हा सामना 1 रनने जिंकला. एक नो बॉल आणि एक वाईड टाकल्यामुळे अकील हुसैनने सुपर ओव्हरमध्ये 8 बॉल टाकले, पण तरीही बांगलादेशला 11 रन करता आले नाहीत.
advertisement
वनडेमध्ये इतिहास घडला
वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यातल्या या सामन्यात इतिहास घडला आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने सर्व 51 ओव्हरमध्ये स्पिन बॉलिंग केली. या सामन्यात बांगलादेशने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, त्यानंतर वेस्ट इंडिजने सर्व 50 ओव्हर स्पिन बॉलिंग केली, एवढंच नाही तर सुपर ओव्हरमध्येही त्यांनी स्पिनरच्या हातातच बॉल दिला. पहिले बॅटिंग करणाऱ्या बांगलादेशचा 50 ओव्हरमध्ये 213/7 एवढा स्कोअर झाला. गुडाकेश मोतीने 3, अकील हुसैनने 2 आणि अलीक अथेन्झने 1 विकेट घेतली. या 3 स्पिनरशिवाय रोस्टन चेस आणि खेरी पेर यांनीही स्पिन बॉलिंग केली, पण त्यांना विकेट घेण्यात यश आलं नाही.
बांगलादेशकडून सौम्य सरकारने सर्वाधिक 45 रन केले, तर नवव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या रिषाद हुसैनने 14 बॉलमध्ये 39 रनची वादळी खेळी केली.
बांगलादेशने 213 रन केल्यानंतर वेस्ट इंडिजलाही त्यांच्या 50 ओव्हरमध्ये 213 रनच करता आले, त्यामुळे मॅच टाय झाली आणि सुपर ओव्हर खेळवली गेली. वेस्ट इंडिजकडून शाय होपने सर्वाधिक 53 रनची खेळी केली, याशिवाय कार्टीने 35 रन, अथेन्झने 28 आणि ग्रीव्हसने 26 केले. बांगलादेशकडून रिषाद हुसैनला सर्वाधिक 3 विकेट मिळाल्या, तनवीर इस्लामने 2, नसुम अहमदने 2 आणि सैफ हसनने 1 विकेट घेतली.