भयंकर आणि अवाजवी हल्ल्याचा निषेध - बीसीसीआय
बीसीसीआय या गहन दुःखाच्या क्षणी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड (ACB), क्रिकेट जगतातील मंडळी आणि मृत खेळाडूंच्या कुटुंबासोबत एकता दाखवते आणि या भयंकर आणि अवाजवी हल्ल्याचा निषेध करत आहे, असं बीसीसीआयने स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे. निरपराध लोकांचा जीव जाणं, विशेषतः होतकरू खेळाडूंचं हे जाणं अत्यंत क्लेशदायक आणि मोठी चिंतेची बाब आहे. या हल्ल्यामुळे क्रिकेट जगतावर दुःखाची छाया पसरली आहे, असंही बीसीसीआयने म्हटलंय.
advertisement
अत्यंत दुःखद आणि चिंतेचा विषय - बीसीसीआय
निष्पाप जीवितहानी, विशेषतः होतकरू खेळाडूंचे, अत्यंत दुःखद आणि चिंतेचा विषय आहे. बीसीसीआय अफगाणिस्तानच्या जनतेप्रती आपल्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त करते आणि त्यांच्या दुःखात व हानीमध्ये सहभागी आहे, असं बीसीसीआयने जारी केलेल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे.
खेळाडूंच्या मृत्युमुळे अफगाणिस्तान क्रिकेटला धक्का
दरम्यान, अफगाणिस्तानमधील नागरिकांना लक्ष्य करून पाकिस्तानने पुन्हा एकदा आपली क्रूरता दाखवली आहे. सामना खेळून घरी परतणाऱ्या अनेक अफगाण क्रिकेटपटूंचाही पाकिस्तानी हवाई हल्ल्यात मृत्यू झाला. पाकिस्तानलष्करी कारवाईमुळे अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड संतापले आहे. पाकिस्तानी बॉम्बस्फोटात अनेक क्लब-स्तरीय खेळाडूंच्या मृत्युमुळे अफगाणिस्तान क्रिकेटला धक्का बसला आहे. त्यामुळे, अफगाणिस्तानने पाकिस्तानशी आपले क्रिकेट संबंध संपवण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानी हवाई दलाने क्लब स्तरावरील अफगाणिस्तानचे क्रिकेट खेळाडू क्रिकेट सामना खेळून घरी परतत असलेल्या ठिकाणीही बॉम्ब हल्ला केला.