दुसऱ्या टीमला तेच नेट्स वापरता येणार नाही
बीसीसीआयच्या नव्या नियमांनुसार, एका टीमने सराव केल्यानंतर दुसऱ्या टीमला तेच नेट्स वापरता येणार नाही. प्रत्येक टीमला सरावासाठी अगदी फ्रेश नेट्स उपलब्ध करून देणे आता बंधनकारक असणार आहे. थ्रो-डाउन करण्यासाठी देखील जुन्या नेट्सचा वापर करण्यास मनाई करण्यात आली असून, जर एखादी टीम वेळेआधी सराव संपवून गेली, तर रिकाम्या नेटवर प्रतिस्पर्धी खेळाडूंना सराव करता येणार नाही, असं बीसीसीआयने स्पष्टपणे सांगितलं आहे.
advertisement
मुख्य पिचवर कोणताही सराव नाही
मुख्य मैदानावरील खेळपट्टीचे संरक्षण करण्यासाठी बोर्डाने सरावाच्या वेळा आणि ठिकाणांबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत. होम ग्राऊंडवर होणाऱ्या पहिल्या मॅचच्या 4 दिवस आधी मुख्य पिचवर कोणताही सराव किंवा सराव मॅच घेता येणार नाही. सराव मॅचसाठी बीसीसीआयची पूर्व परवानगी आवश्यक असून ती मॅच 3.5 तासांपेक्षा जास्त वेळ चालणार नाही, याची काळजी फ्रँचायझींना घ्यावी लागणार आहे.
दोन्ही टीम्सना 2-2 तासांचे दोन वेगळे स्लॉट
सरावाच्या वेळेबाबत वाद निर्माण झाल्यास बीसीसीआय स्वतः यामध्ये मध्यस्थी करणार आहे. अशा वेळी दोन्ही टीम्सना 2-2 तासांचे दोन वेगळे स्लॉट दिले जातील, जेणेकरून कोणावरही अन्याय होणार नाही. अहमदाबाद आणि लखनऊ सारख्या स्टेडियमवर मातीचा प्रकार पाहून होम टीमला सुरुवातीच्या 90 मिनिटांसाठी आपली आवडती खेळपट्टी निवडण्याचा विशेष अधिकार देण्यात आला आहे.
वैद्यकीय मदत, सुरक्षा आणि जेवणाची सोय
दरम्यान, शेवटच्या टप्प्यात खेळाडूंच्या सुविधांची जबाबदारी देखील निश्चित करण्यात आली आहे. सरावादरम्यान वैद्यकीय मदत, सुरक्षा आणि जेवणाची सोय होम टीमला करावी लागेल, मात्र पिण्याच्या पाण्याची आणि इतर पेयांची सोय पाहुण्या टीमला स्वतः करावी लागणार आहे. 16 मार्चसून सर्व टीम्सना सरावासाठी नेट्स आणि रेंज हिटिंगचे स्लॉट दिले जातील, ज्यामध्ये वेळापत्रकाचे पालन करणं अनिवार्य असेल, असं बीसीसीआयने स्पष्टच सांगितलं आहे.
