प्रीती झिंटा आणि तिचे सह-मालक नेस वाडिया यांनी मिळून 2008 मध्ये ही टीम खरेदी केली होती. पंजाब किंग्सच्या मालकी हक्कात प्रीती झिंटा यांचा हिस्सा सुमारे 24 टक्के आहे. तर उर्वरित हिस्सा इतर गुंतवणूकदारांकडे आहे. IPL टीम्सच्या मालकी हक्कात वेळोवेळी बदल होत असतात. पण सध्या प्रीती झिंटाची भागीदारी 23-24 टक्क्यांच्या आसपास आहे. म्हणजेच हळूहळू गुंतवणूकदारांचा प्रभाव या टीमवर वाढू लागला आहे.
advertisement
पंजाब किंग्ससाठी प्रीती काहीही करेल
प्रीती झिंटा जेव्हा टीमची मालकीण झाली. तेव्हा ती बॉलिवूडमध्ये टॉपवर होती. 2008 पासून तिनं इंडियन प्रीमियर लीग दरम्यान क्रिकेटबद्दलच्या आपल्या प्रेम आणि पाठिंब्याला एक नवा आयाम दिला. पंजाब किंग्स ज्याला आधी "किंग्स इलेव्हन पंजाब" या नावाने ओळखलं जात होतं.त्याची सह-मालकीण म्हणून तिनं आपली भागीदारी जाहीर केली होती. ही भागीदारी केवळ एक व्यवसायिक निर्णय नव्हता. तर त्यातून तिनं क्रिकेट बद्दलची आवड आणि आपल्या राज्य पंजाबप्रती प्रेमही दाखवलं.
प्रीतीच्या संयमाला तोड नाही
प्रीती झिंटाच्या टीमनं म्हणजे किंग्स इलेव्हन पंजाबनं पहिल्या सिझनमध्ये चांगला परफॉर्मन्स केला होता. मात्र टीम कधीच IPL ट्रॉफी जिंकू शकली नाही. तरीही प्रीतीनं नेहमी टीमच्या खेळाडूंना आणि त्यांच्या प्रयत्नांना सपोर्ट दिला. ती अनेक वेळा सामन्यांदरम्यान मैदानात दिसायची आणि खेळाडूंना प्रोत्साहित करायची. तिच्या सक्रिय उपस्थितीमुळे टीममध्ये एक सकारात्मक वातावरण तयार व्हायचं. तिनं नेहमी टीमबद्दलची आपली कमिटमेंट स्पष्ट केली. ती सामन्यांदरम्यान उपस्थित असायची, खेळाडूंना भेटायची, त्यांच्यासोबत फोटो काढायची. तिचा उत्साह आणि ऊर्जा खेळाडूंना प्रेरणा देणारी होती. याव्यतिरिक्त ती खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यातही त्यांना सपोर्ट करत होती.
पंजाब किंग्ससाठी प्रचार आणि ब्रँडिंग
प्रीती झिंटाचं योगदान केवळ एक टीम ओनर म्हणूनच नव्हतं. तर टीमच्या प्रचार आणि ब्रँड तयार करण्यातही तिनं महत्त्वाची भूमिका बजावली. 2021 मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबनं आपलं नाव बदलून "पंजाब किंग्स" केलं. जे टीमच्या नव्या उद्दिष्टांचं आणि दृष्टिकोनाचं प्रतीक होतं. या बदलाबाबत प्रीतीनं आपले विचार मांडले होते. तिनं याला टीमच्या भविष्यासाठी एक सकारात्मक पाऊल मानलं आणि आपल्या चाहत्यांकडून पाठिंबा मिळवण्याची अपेक्षा व्यक्त केली. तिच्या प्रसिद्धीचा आणि लोकप्रियतेचा फायदा टीमला झाला. तिच्या उपस्थितीमुळे किंग्स इलेव्हन पंजाब एक मोठा ब्रँड म्हणून स्थापित झाला. मीडिया आणि प्रायोजकांमध्ये तिची चांगली छबी आणि संबंधांमुळे टीमला एक मजबूत व्यवसाय मॉडेल मिळालं.
संघाचे मालक कोण?
पंजाब किंग्ज संघाचे 4 जण मालक आहेत. पंजाब किंग्ज ड्रीम क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेडमध्ये प्रीतीची मालकी 23 टक्के इतकी आहे. यातील सर्वाधिक मालकी मोहित बर्मन यांच्याकडे असून ती 48 टक्के इतकी आहे. नेस वाडिया यांच्याकडे 23 टक्के इतकी मालकी आहे. तर उर्वरीत हिस्सा करण पॉल यांच्याकडे आहे.
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात मोहित बर्मन केपीएच ड्रीम क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेडमधील आपली मालकीतील काही हिस्सा विकणार असल्याचे वृत्त समोर आले होते. अशा प्रकारे संघातील मालकी अन्य व्यक्तीला विकण्यापासून रोखण्यासाठी प्रितीने उच्च न्यायालयात याचिका दाकल केल्याचे वृत्त होते.
दरम्यान, गेल्या 18 हंगामांपासून पंजाब संघ पहिल्या आयपीएल विजेतेपदाच्या प्रतिक्षेत आहे. या वर्षी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाबने अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र आरसीबीकडून त्यांचा पराभव झाला.