नदालने त्याच्या टेनिस कारकिर्दीत पहिल्यांदाच क्ले कोर्टवर दोन सामने गमावले. नदाल फ्रेंच ओपनच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच चौथ्या फेरीआधी स्पर्धेतून बाहेर झाला. पहिल्याच फेरीत अलेक्झांडर ज्वेरेव याने नदालचा पराभव केला. 3-6,6-7, 3-6 अशा फरकाने नदाल पराभूत झाला.
T20 World Cup : अमेरिकेत कसे होणार भारताचे सामने? कधी, कुणासोबत भिडणार, खास HD वेळापत्रक Photos
advertisement
नदालचं वय ३८ वर्षे इतकं आहे. २२ ग्रँड स्लॅम जिंकलेला नदाल पुढच्या फ्रेंच ओपनमध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे. जानेवारी २०२३ पासून तो मांडी आणि पोटदुखीने त्रस्त आहे. वर्षभरात त्यानं १५ सामने खेळले असून यात त्याने ८ विजय मिळवले तर ७ पराभव पत्करले आहेत. दुखापतींचा सामना करणाऱ्या नदालचा कामगिरीवरही परिणाम झाला. त्यामुळे त्याची क्रमवारी २७५ पर्यंत खाली घसरली.
राफेल नदाल पहिल्यांदाच फ्रेंच ओपनमध्ये बिगरमानांकित खेळाडू होता. त्याचा पहिल्याच फेरीत अलेक्झांडर ज्वेरेव याच्याशी सामना झाला. ज्वेरेव जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर आहे. ज्वेरेवने सरळ सेटमध्ये नदालला हरवून स्पर्धेबाहेर फेकलं.
नदालला २००९ मध्ये सोडरलिंगकडून चौथ्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. २०१६ आणि २०२१ मध्येही त्याने तिसऱ्या फेरीत आणि सेमीफायनलमध्ये जोकोविचनं हरवलं होतं. फ्रेंच ओपनमध्ये त्याने आतापर्यंत ११२ सामने जिंकले अशून ४ सामन्यात पराभव झाला आहे.
