TRENDING:

IPLचा विक्रमवीर संसाराच्या धावपट्टीवर आऊट? पत्नीचे फोटो डिलीट,अनफॉलो केले

Last Updated:

गेल्या काही वर्षात अनेक भारतीय क्रिकेटपटूंचे घटस्फोट झाले आहेत. सध्या युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाचे वृत्त समोर येत असताना आता आणखी एका क्रिकेटपटूच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा सुरू झाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंच्या वैवाहिक आयुष्याला कोणाची नजर लागली की काय असे वाटू लागले आहे. गेल्या काही काळात अनेक क्रिकेटपटूंचे घटस्फोट झाले आहेत. शिखर धवन आणि आयशा मुखर्जी, हार्दिक पंड्या आणि नताशा स्टेनकोविक त्यानंतर आता युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाचे वृत्त येत आहे. या दोघांनी एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो देखील केले आहे. चहलने तर धनश्री सोबतचे फोटो देखील काढून टाकले आहेत. अशात आता आणखी एका भारतीय क्रिकेटपटू आणि त्याच्या पत्नीमध्ये सर्व काही ठीक चालले नसल्याचे वृत्त समोर येत आहे.
News18
News18
advertisement

भारताचा अनुभवी क्रिकेटपटू मनीष पांडे आणि त्याची पत्नी आश्रिता शेट्टी यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचे समजते. गेल्या काही काळापासून भारतीय संघातून बाहेर असलेला मनीष पांडेने इंस्टाग्राम प्रोफाइलवरून पत्नी आश्रिता शेट्टीचे सर्व फोटो गायब आहेत. मनीष पांडे तसा सोशल मीडियावर फार कमी सक्रीय असतो. पण त्याने पत्नी सोबतचे अनेक फोटो शेअर केले होते. आता हे सर्व फोटो हटवण्यात आले आहेत. आश्रिता शेट्टीने देखील तिच्या प्रोफाइलवरून मनीष पांडेचे फोटो हटवले आहेत. दोघे आता सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो देखील करत नाहीत.

advertisement

...तर भारतातील ९९% लोक दुसऱ्या दिवशी कामावर जाणार नाहीत

मनीष पांडे ने २०१५ साली भारताकडून पदार्पण केले होते. २०१९ साली आश्रिता सोबत त्याचा विवाह झाला होता. आश्रिता कर्नाटकची असून ती तामिळ चित्रपटात अभिनेत्री आहे. दोघांच्या विवाहानंतर भारतीय संघांच्या लढती आणि आयपीएल सामन्यात आश्रिता दिसली होती. मात्र आयपीएल २०२४च्या हंगामात आश्रिता सामने पाहण्यासाठी दिसली नाही. मनीष कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून खेळत होता आणि संघाने विजेतेपद देखील मिळवले होते. मात्र या विजेतेपदानंतर देखील आश्रिताने कोणताही पोस्ट टाकली नव्हती.

advertisement

हे कोडे सोडवा आणि 8.5 कोटींचे बक्षीस जिंका, 100 वर्षे उत्तर सापडले नाही

आयपीएल स्पर्धेत शतक करणारा पहिला भारतीय अशी मनीष पांडेची ओळख आहे. २००९ साली रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळताना मनीषने शतकी खेळी केली होती. २०२१ नंतर त्याला भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याने भारताकडून २९ वनडेत ५६६ आणि ३९ टी-२० मध्ये ७०९ धावा केल्या आहेत.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPLचा विक्रमवीर संसाराच्या धावपट्टीवर आऊट? पत्नीचे फोटो डिलीट,अनफॉलो केले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल